शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर आरटीओतील चार निरीक्षकांची धुळ्यात बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:10 IST

धुळे आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज तडवी लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन आयुक्तांनी या कार्यालयातील ११ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या राज्यातील विविध आरटीओ कार्यालयात केल्या, तर त्यांच्या जागेवर नागपूर शहरमधून एक, नागपूर ग्रामीणमधून तीन, अमरावतीमधून तीन, लातूरमधून दोन, बारामतीमधून एक व उस्मानाबाद आरटीओ कार्यालयातून एक मोटार वाहनरिक्षकांची बदली करण्यात आली आहे. कार्यालयाने बदल्यांना ‘सेवा वर्ग’ हे नाव दिले असलेतरी ते कधीपर्यंत राहतील याचा उल्लेख नाही. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देतडवी लाच प्रकरण : धुळे आरटीओतील अकराही निरीक्षकांच्या राज्यात बदल्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : धुळे आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी परवेज तडवी लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन आयुक्तांनी या कार्यालयातील ११ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या राज्यातील विविध आरटीओ कार्यालयात केल्या, तर त्यांच्या जागेवर नागपूर शहरमधून एक, नागपूर ग्रामीणमधून तीन, अमरावतीमधून तीन, लातूरमधून दोन, बारामतीमधून एक व उस्मानाबाद आरटीओ कार्यालयातून एक मोटार वाहनरिक्षकांची बदली करण्यात आली आहे. कार्यालयाने बदल्यांना ‘सेवा वर्ग’ हे नाव दिले असलेतरी ते कधीपर्यंत राहतील याचा उल्लेख नाही. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.धुळे आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या तपासणी नाक्यावर नेमणुकीसाठी एका मोटार वाहन निरीक्षकाकडून साडेचार लाखांच्या लाचेची मागणी करणारे परवेज तडवीला नुकतेच नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. विशेष म्हणजे, दोन महिन्यांत तडवीला लाच प्रकरणात दुसऱ्यांदा अटक झाली. परिवहन आयुक्त कार्यालयाने याची दखल घेतली. प्रकरण सामान्य होईपर्यंत येथील ११ मोटार वाहन निरीक्षकांची राज्यात विविध आरटीओ कार्यालयात बदल्यांचे सोमवारी निर्देश दिले. तर त्यांच्या ठिकाणी नागपूर शहर आरटीओतील सौरभ पाटील, नागपूर ग्रामीण आरटीओतील संजयकुमार पेंढारकर, विजयकुमार महाजन, राजेश बोराळे, अमरावती आरटीओतील हेमंत खराबे, हितेश दावडा, नितीन घोडके, लातुर आरटीओतील बजरंग कोरावले, संदीप शिंदे, बारामती उपआरटीओतील सुरेश तुरकणे व उस्मानाबाद उपआरटीओतील अतुल नांदगावकर यांची बदली करण्यात आली. बदल्यांच्या या आदेशाने आरटीओ कार्यालयात चर्चेला पेव फुटले आहे. धुळे आरटीओ कार्यालयातील लाच प्रकरणाचा फटका इतर कार्यालयांना बसल्याने काही निरीक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेष म्हणजे, अमरावती व नागपूर ग्रामीण आरटीओतील तब्बल तीन-तीन मोटार वाहन निरीक्षकांना धुळे येथे पाठविण्यात आल्याने आणि त्यांच्या मोबदल्यात कुणीच न दिल्याने कामकाज प्रभावित होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसTransferबदली