शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चार ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी गुरुवारी (दि. ११) निवडणूक घेण्यात आली. त्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवनी : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी गुरुवारी (दि. ११) निवडणूक घेण्यात आली. त्यात चार ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी तर प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर शिवसेना व काँग्रेस समर्थित गटांच्या उमेदवारांनी बाजी मारली. परिणामी, भाजप समर्थित गटाला एकाही ग्रामपंचायतीवर सत्ता प्रस्थापित करता आली नाही. यानिमित्ताने पारशिवनी तालुक्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील नेते व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय व एकजूट दिसून आली.

पिपळा येथे महाविकास आघाडी समर्थित गटात एकजूट दिसून आली. येथे सरपंचपदी सचिन आमले तर उपसरपंचपदी गौतम गजभिये यांची निवड करण्यात आली. ईटगाव ग्रामपंचायतीवर शिवसेना समर्थित गटाने सत्ता संपादन केली. येथे सरपंचपदी अतुल काळे तर उपसरपंचपदी ज्ञानेश्वर वासे यांची वर्णी लागली. आमगाव येथे माया गाेरले सरपंचपदी तर रमेश शिवणकर उपसरपंचपदी विजयी झाले. माहुली ही पारशिवनी तालुक्यातील माेठी व भाजप समर्थित गटाचा गड मानली जाणारी ग्रामपंचायत हाेय. या निवडणुकीत महाविकास आघाडी समर्थित गटाने भाजप समर्थित गटाचा धुव्वा उडविला. येथे सरपंचपदी काँग्रेस समर्थित गटाचे प्रेमचंद कुसुंबे तर उपसरपंचपदी शिवसेना समर्थित गटाच्या माया अमृते यांनी बाजी मारली.

नवेगाव खैरी येथे कमलाकर कोठेकर सरपंच तर राजू पुरकाम यांची उपसरपंचपदी वर्णी लागली. खेडी येथे या वेळी महिलाराज आले. येथील सरपंचपदी काँग्रेस समर्थित गटाच्या छाया कोकाटे व उपसरपंचपदी संगीता इंगळे या विराजमान झाल्या. निमखेडा येथे सरपंचपदासाठी काँग्रेस समर्थित गटाच्या कला तडस यांना ईश्वरचिठ्ठीने काैल दिला तर उपसरपंचपदी देवा डोंगरे यांनी बाजी मारली. सुवरधरा येथे आदिवासीबहुल गाव असून, येथे शिवसेना समर्थित गटाने एकहाती सत्ता प्रस्थापित केली. येथे सरपंचपदी केशवंता इडपा तर उपसरपंचपदी गजू सावरकर यांनी विजय संपादन केला. खंडाळा (घटाटे) येथे महाविकास आघाडी समर्थित गटाच्या विमल बोरकुटे यांनी सरपंच तर चेतन कुंभलकर यांनी उपसरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली.

....

सदस्यांवर नेत्यांचे लक्ष

सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक जवळ येताच राजकीय नेत्यांनी त्यांच्या ग्रामपंचायत सदस्यांना सुरक्षित स्थळी नेले हाेते. नवनिर्वाचित सदस्य विराेधकांच्या संपर्कात येणार नाहीत, याची काळजीही घेतली हाेती. गुरुवारी दुपारी निवडणूक प्रक्रिया सुरू हाेताच सर्व सदस्यांना त्यांच्या गावांमध्ये आणले हाेते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण हाेऊन निकाल जाहीर हाेईपर्यंत या सदस्यांवर त्यांच्या नेत्यांनी बारकाईने लक्ष ठेवले हाेते. त्यामुळे कुणालाही बंडखाेरी करण्याची अथवा विराेधात जाण्याची संधी मिळाली नाही.

....

बोरी (सिंगारदीप) येथील सरपंचपद रिक्त

बोरी (सिंगारदीप) येथील सरपंचपद अनुसूचित जाती महिलाकरिता राखीव करण्यात आले होते. वास्तवात, येथे या प्रवर्गातील उमेदवारच नसल्यामुळे सरपंचपदाची निवडणूक हाेऊ शकली नाही. त्यामुळे सेथील सरपंचपद रिक्त आहे. येथे शिवसेना समर्थित गटाच्या शुभांगी डोहणे यांनी उपसरपंचपदाची निवडणूक जिंकली. तालुक्यातील या १० गावांंपैकी एकाही गावात भाजप समर्थित गटाला त्यांचा सरपंच निवडून आणता आला नाही. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यातील अंतर्गत मतभेदाचे खापर वरिष्ठ नेत्यांवर फाेडले.