शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहर बससाठी ३४ एकर जागेत चार डेपो

By admin | Updated: October 20, 2016 03:03 IST

नागपूर शहरातील प्रवाशांना चांगल्या दर्जाची बससेवा मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाने विविध सुधारणा हाती घेतल्या आहेत.

मनपा जागा देणार : नवीन आॅपरेटरची नियुक्तीनागपूर : नागपूर शहरातील प्रवाशांना चांगल्या दर्जाची बससेवा मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाने विविध सुधारणा हाती घेतल्या आहेत. यात नवीन आॅपरेटरच्या नियुक्तीसोबतच बस डेपोसाठी शहरातील चार ठिकाणी ३४ एकर जागा उपलब्ध करण्याला महापालिका प्रशासनाने सहमती दर्शविली आहे. बुधवारी परिवहन समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.शहरातील बसेस उभ्या करण्यासाठी व देखभाल करण्यासाठी यशवंत स्टेडियम येथील काही जागेचा वापर केला जातो. तसेच हिंगणा नाका येथे जागा उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु ही जागा पुरेशी नाही. शहर बस संचालनासाठी नवीन चार आॅपरेटरची नियुक्ती केली जाणार आहे. ६०० बसेस उभ्या करण्यासाठी जागेची उणीव भासणार आहे. ग्रीन बस आॅपरेटरला यापूर्वीच वाडी व खापरी नाका येथे जागा देण्यात आली आहे. लाल बसेससाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या तीन आॅपरेटला जागा उपलब्ध केली जाणार आहे. यात भांडेवाडी येथे १६ एकर, वाठोडा येथील स्वामी नारायण मंदिराजवळ ८ एकर तर गोरेवाडा व कोराडी येथे प्रत्येकी ५ एकर जागा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती बाल्या बोरकर यांनी दिली. आॅपरेटरला जागा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यानुसार जागा उपलब्ध क रण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या जागेचा मोबदला म्हणून महापालिका संबंधित आॅपरेटरकडून या जागेचे भाडे वसूल करणार आहे. (प्रतिनिधी)१५ नोव्हेंंबरपर्यंत ५५ ग्रीन बस१५ नोव्हेंबरपर्यत शहरात ५५ ग्रीन बसेस चालविण्याचे उद्दिष्ट महापालिकेच्या परिवहन समितीने ठेवले आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. सर्व प्रकारची मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रीन बस लोकार्पणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहे.