शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

विकास प्रकल्पातून चौफेर विकास ! महापालिका आयुक्त अभिजित बांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:12 IST

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात मेट्रो रेल्वे, सिमेंट काँक्रिट रोड, ऑरेंज सिटी स्ट्रीट , नागनदी सौंदर्यीकरण यासह विविध विकास प्रकल्प राबविले जात आहे. नागपूर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. महापालिकेचे आर्थिक स्रोत विचारात घेता आर्थिक स्थिती चांगली नाही. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यावयाचा आहे. त्यातच मोठ्या प्रकल्पात महापालिकेलाही वाटा द्यावयाचा असल्याने आर्थिक भार वाढला आहे. याचा शहरातील मूलभूत सुविधावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहराचा चौफेर विकासाचा दावा केला आहे. त्यांच्याशी केलेली बातचित.

गणेश हूड /लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. शहरात मेट्रो रेल्वे, सिमेंट काँक्रिट रोड, ऑरेंज सिटी स्ट्रीट , नागनदी सौंदर्यीकरण यासह विविध विकास प्रकल्प राबविले जात आहे. नागपूर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. महापालिकेचे आर्थिक स्रोत विचारात घेता आर्थिक स्थिती चांगली नाही. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्यावयाचा आहे. त्यातच मोठ्या प्रकल्पात महापालिकेलाही वाटा द्यावयाचा असल्याने आर्थिक भार वाढला आहे. याचा शहरातील मूलभूत सुविधावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहराचा चौफेर विकासाचा दावा केला आहे. त्यांच्याशी केलेली बातचित.प्रश्न:आर्थिक स्थिती सावरण्यासाठी उपाययोजना आहेत का?अभिजित बांगर :राज्य सरकारकडून १५० कोटींचा विशेष निधी, जीएसटी अनुदान फरकाचे १०१ कोटी प्राप्त झाले. तसेच दर महिन्याच्या जीएसटी अनुदानात ३६ कोटींनी वाढ केली. यामुळे बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या मनपाला बळ मिळाले. मालमत्ताकर, पाणीपट्टी, नगररचना व बाजार विभागाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न आहे.प्रश्न:शहरातील कचऱ्याची समस्या दूर कशी करणार?अभिजित बांगर :घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता आगामी मार्च महिन्यापासुन शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जाईल. नागपूर शहरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या ३०८ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलीप्रश्न: पट्टे वाटपाचा प्रश्न कसा सोडविणार?अभिजित बांगर : राज्य सरकारने २०११ पूर्वी शासकीय जागांवर वसलेले अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतला. नागपूर शहरातील दीड लाखांहून अधिक लोकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नासुप्र व महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्टीधारकाना पट्टे वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. याला गती देण्याचा प्रयत्न आहे.प्रश्न:बंद पडलेली ग्रीन बस सेवा पुन्हा सुरू होणार का ?अभिजित बांगर : ग्रीन बस संचालनासाठी स्वीडनची कंपनी स्कॅनिया व महापालिका यांच्यात करार झाला आहे. यातील शर्तीनुसार स्कॅनिया आपली जबाबदारी दुसऱ्या ऑपरेटरक डे अटी व शर्तीनुसार हस्तांतरित करत असेल तर यावर विचार केला जाईल. यासाठी स्कॅनिया कंपनीची तयारी आहे. यावर लवकरच निर्णय होईल. नागपूर शहरात ग्रीन बस पुन्हा धावतील. पर्यावरण पूरक परिवहनाला प्रोत्साहन देण्याची महापालिकेची भूमिका आहे.प्रश्न : नागनदी सौंदर्यीकण प्रकल्प कधी सुरू होणारअभिजित बांगर : नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे यावर एकूण खर्च १२५२.३३ कोटी रुपये असून, ८५ टक्के कर्ज १०६४.४८ कोटी रुपये जपान सरकार उपलब्ध करून वित्तीय व्यवस्थापनाकरिता जिका (जपान) संस्थेतर्फे कर्ज उपलब्ध होणार आहे. जानेवारीअखेरीस जपानचे शिष्टमंडळ नागपूर दौऱ्यावर येत आहे. सहा महिने सर्वे करून ऑक्टोबर महिन्यात कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.

 

 

 

टॅग्स :Abhijit Bangarअभिजित बांगरinterviewमुलाखत