शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नेतागिरी करणा-या महिलेकडून चोरीचे चार गुन्हे उघड

By admin | Updated: February 28, 2017 21:42 IST

राजकीय पक्षाची शाल घेऊन नेतागिरी करीत फिरतानाच विविध कार्यक्रमात चोरी करणा-या विमल संगीतबाबू इंगळे (वय ५०, रा. अजनी) नामक महिलेकडून सीताबर्डी

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 -  राजकीय पक्षाची शाल घेऊन नेतागिरी करीत फिरतानाच विविध कार्यक्रमात चोरी करणा-या विमल संगीतबाबू इंगळे (वय ५०, रा. अजनी) नामक महिलेकडून सीताबर्डी पोलिसांनी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले आहे. या गुन्ह्यात तिने चोरलेल्या पर्स, विदेशी चलन, मोबाईल, साड्या, घड्याळांसह मोठा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. 
  १२ जुलैला कुसुमताई वानखेडे सभागृहातील लग्नसमारंभात शिरलेल्या विमल इंगळे हिने  दीपाली संदीप राऊत (प्रतापनगर) यांची ४५ हजारांची रोकड आणि मोबाईल ठेवलेली पसर चोरली होती. राऊत यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी केली आणि विमल तसेच तिचा मुलगा (अजनीतील तडीपार गुंड) करण संगीतबाबू इंगळे (वय २०) या दोघांना अटक केली. चौकशीत विमल हिने हा गुन्हा करण्यापुर्वी बजाजनगरातील सन्मान लॉन, सक्करद-यातील महात्मा फुले सभागृह, फेब्रुवारी २०१५ मध्ये वानखेडे सभागृहातत अशाच प्रकारे चोरी केल्याचे उघड झाले. तिने या गुन्ह्यांची कबुली देतानाच वेगवेगळळ्या ठिकाणांहून चोरलेल्या पर्स, त्यातील विदेशी चलन, मोबाईल, महिलांची सौंदर्यप्रसाधने, घड्याळं, कॅमेरा, साड्या,ब्लाऊजही पोलिसांना काढून दिले. रोख रक्कम मात्र तिने खर्च केली. 
 
अनेक वर्षांपासून सक्रीय  
विविध राजकीय, तसेच सामाजिक कार्यक्रमात जाऊन नेतागिरी करणा-या आणि प्रसंगी अनेक प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन हस्तक्षेप करणा-या विमल इंगळेची दुहेरी भूमीका अनेक वर्षांपासून सुरू होती. तिने केलेल्या चो-यांपैकी अनेक ठिकाणची तक्रारच दाखल न झाल्यामुळे तिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मालाबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. लग्न समारंभ किंवा अशाच कुण्या कार्यक्रमात पर्स चोरीला गेली असेल, त्यांनी सीताबर्डी ठाण्यात संपर्क केल्यास पुन्हा काही गुन्हे उजेडात येऊ शकतात.