शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चार वकिलांनी न्यायालयाचा अवमान केला : नोटीस जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 22:55 IST

अकोला येथील अ‍ॅड. मधुसुदन बी. शर्मा (५०), दिनेश रामेश्वरलाल खुरानिया (४०), अजय नीळकंठ जोशी (४०) व श्रवण काशिद या चार वकिलांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदृष्ट्या दिसून येते असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नोंदवले. तसेच, या वकिलांविरुद्धचे अवमानना प्रकरण अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतले व त्यांना नोटीस बजावून १ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्दे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकोला येथील अ‍ॅड. मधुसुदन बी. शर्मा (५०), दिनेश रामेश्वरलाल खुरानिया (४०), अजय नीळकंठ जोशी (४०) व श्रवण काशिद या चार वकिलांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे प्रथमदृष्ट्या दिसून येते असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नोंदवले. तसेच, या वकिलांविरुद्धचे अवमानना प्रकरण अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतले व त्यांना नोटीस बजावून १ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अकोला जिल्हा न्यायालयाने या वकिलांविरुद्ध उच्च न्यायालयाकडे अवमाननेचा रेफरन्स सादर केला होता. एका फौजदारी प्रकरणातील आरोपी २०१६ पासून फरार होता. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने त्याच्याविरुद्ध १८ जून २०१८ रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. त्यानंतर आरोपीतर्फे शर्मा यांनी न्यायालयात हजर होऊन आरोपीला जामीन मागितला. जामीन नाकारण्यात आल्यानंतर शर्मा यांनी न्यायालयाची बदनामी व नकारात्मक प्रसिद्धी करायला सुरुवात केली. त्यांनी ते स्वत: अ‍ॅडमिन असलेल्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरही न्यायालयाचा अवमान करणाऱ्या पोस्ट टाकल्या. इतर तीन वकील त्या ग्रुपचे सदस्य होते. त्यांनीदेखील विविध आक्षेपार्ह पोस्टद्वारे न्यायालयाचा अवमान केला. शर्मा यांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यासाठी वकिलांमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवली. दरम्यान, अकोला वकील संघ जिंदाबाद अशा घोषणा दिल्या असे रेफरन्समध्ये नमूद करण्यात आले होते. या प्रकरणात अ‍ॅड. फिरदोस मिर्झा न्यायालय मित्र असून त्यांना अ‍ॅड. अब्दुल सुभान यांनी सहकार्य केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल