शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीचा जीवघेणा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:45 IST

शेतात फवारणी करताना विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक शेतकºयांचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असताना नागपूर जिल्ह्यातही एका शेतकºयाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देशेतकºयाचा गेला जीव भिवापूरच्या धामणगावातील घटना तीन दिवसांपासून सुरू होते उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनांद : शेतात फवारणी करताना विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक शेतकºयांचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असताना नागपूर जिल्ह्यातही एका शेतकºयाचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून सदर शेतकºयावर उपचार सुरू होता. त्यातच त्याचा मंगळवारी (दि. ३) मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.प्रभाकर बापूराव मिसाळ (५१, रा. धामणगाव - गवळी, ता. भिवापूर, जि. नागपूर) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. दसºयाच्या दुसºया दिवशी, रविवारी (दि. १) ते मुलासह शेतात कपाशीच्या फवारणीसाठी गेले. त्यांनी फवारणीपंपाद्वारे फवारणी सुरू केली तर त्यांचा मुलगा पाणी आणून देत होता. अशात त्यांना भोवळ आली. वाढत्या तापमानात गर्मीमुळे भोवळ आली असावी म्हणून त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. त्यानंतरही त्यांनी फवारणी सुरूच ठेवली. त्यातच त्यांच्या अंगावर फवारणीचे कीटकनाशक उडाले तसेच श्वसनाद्वारे आत गेले. त्यामुळे त्यांना उलटीचा त्रास सुरू झाल्याने त्यांनी मुलाला सदर बाब सांगितली असता मुलाने त्यांना लगेच नांद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तातडीने नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल)मध्ये हलविले. तेथे तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होता. मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अशात त्यांचा मंगळवारी मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला.प्रभाकर यांच्या मृत्यूची माहिती बुधवारी सकाळच्या सुमारास धामणगावसह परिसरात मिळताच शोककळा पसरली. प्रभाकर यांची धामणगाव शिवारात सात एकर शेती आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. प्रभाकर यांनी एका फायनान्स कंपनीसह सेवा सोसायटीकडून कर्जाची उचल केल्याची माहिती आहे.कपाशीची पाती आणि फुलांची गळ वाढलीयावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली. कपाशी सध्या जोमात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढते तापमान आणि परतीच्या पावसामुळे कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी पाती आणि फुलांची गळ वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यातून वाचण्यासाठी शेतकरी महागड्या कीटकनाशकाची फवारणी करीत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. ही फवारणीच शेतकºयांसाठी जीवघेणी ठरू पाहत आहे. यवतमाळातील घटनेनंतर आता नागपूर जिल्ह्यातही अशाप्रकारची घटना घडली.