शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
3
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
4
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
5
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
6
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
7
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
8
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
9
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
10
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
11
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
12
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
13
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
14
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
15
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
16
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
17
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
18
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
19
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
20
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

सासू-सूनेच्या तक्रारीतून फुलले हास्याचे कारंजे

By admin | Updated: June 29, 2014 00:45 IST

सासू-सूनेचे नाते जगात प्रसिद्ध आहे. घराघरातील सासू-सूनेच्या तू-तू-मै-मै-ला व्यासपीठावर आणल्यानंतर काय धम्माल उडते, याची प्रचिती मुंडले सभागृहात आली. एरवी सासू-सूनेच्या तू-तू-मै-मै- ने घरातील

सासू-सून जोडी नंबर वन : लोकमत सखी मंचचा उपक्रमनागपूर : सासू-सूनेचे नाते जगात प्रसिद्ध आहे. घराघरातील सासू-सूनेच्या तू-तू-मै-मै-ला व्यासपीठावर आणल्यानंतर काय धम्माल उडते, याची प्रचिती मुंडले सभागृहात आली. एरवी सासू-सूनेच्या तू-तू-मै-मै- ने घरातील वातावरण गंभीर होते. मात्र येथे या तक्रारीतून विनोद निर्माण झाले. आणि सभागृहात हास्याचे कारंजे फुलले. लोकमत सखी मंच व कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सासू-सून जोडी नंबर वन’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात लोकमत सखी मंचच्या सदस्यांपैकी १० कुटुंबातील सासू-सूनेने सहभाग घेतला होता. स्पर्धेत बिनधास्त बोल, परफेक्ट मॅचिंग, टॅलेंट राऊंड आणि प्रश्न उत्तरे अशा चार फेऱ्या होत्या. बिनधास्त बोल या फेरीपासून स्पर्धेला सुरुवात झाली. दहा सासू आणि त्यांच्या सूना मंचावर बसल्या होत्या. सुरुवातीला सासू आणि सूनांनी एकमेकांचे भरभरून कौतुक केले. तेव्हा दोघांचेही डोळे पाणावले. काही सासवांच्या डोळ्यांना आनंद आसवांची धारच लागली होती. मात्र जेव्हा निवेदिकेने त्यांचा चिमटा काढला, तेव्हा या दोघींनीही एकमेकींची गऱ्हाणी सांगण्यास कुठलीही कमतरता सोडली नाही. आपापल्या घरातील गऱ्हाणी जेव्हा सार्वजनिक होतात, तेव्हा कसा हंशा पिकतो, बघणारे कसा आनंद लुटतात, हे सासू-सून जोडी नंबर वनमध्ये उपस्थित रसिकांनी चांगलेच अनुभवले. सासू-सूनेच्या तू-तू-मै-मै- चा उपस्थित रसिकांनी चांगलाच आनंद लुटला.परफेक्ट मॅचिंग या फेरीत सासू आणि सूनेने आपापली आवड, स्वभाव यावर चर्चा केली. याफेरीसाठी स्पर्धेपूर्वी दोघींकडून एक फॉर्म भरून घेण्यात आला होता. या फॉर्म मध्ये लिहिलेल्या आवडीनिवडी आणि प्रत्यक्ष मंचावर सादर केलेल्या आवडीनिवडी यात किती तफावत आहे, हे परीक्षकांनी लक्षात घेतले. तृतीय फेरी ही प्रश्नोत्तराची होती. यात परीक्षकांनी काही प्रश्न दोघांनाही विचारले. यातूनही उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले. चौथ्या फेरीत स्पर्धकांनी गायन, अभिनय आणि मिमिक्री सादर केली. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून प्रतिष्ठानच्या आरती शशिकांत बोदड, कल्पना भेंडे उपस्थित होत्या. परीक्षक म्हणून मंदा गौर, रंजना दाते आणि डॉ. मानसी सहस्रबुद्धे यांनी काम पाहिले. संचालन सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. सासू-सुनेची विजयी जोडीसंपूर्ण फेऱ्यांचे परीक्षण झाल्यानंतर परीक्षकांनी पहिल्या तीन पुरस्काराची घोषणा केली. यात सासू आरती कावळे व सून तेजस्विनी कावळे ही जोडी नंबर वन राहिली. द्वितीय स्थान अनिता दारव्हेकर व परिणिता दारव्हेकर व तृतीय स्थान रमा फुके व डॉ. परिणिता फुके या जोडीने पटकाविले. परीक्षकांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.