शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात खचत आहेत किल्ले

By admin | Updated: October 21, 2014 00:55 IST

आरमोरी भागात अनेक ऐतिहासिक मंदिर, गडकिल्ले आहेत. परंतु यांची देखभाल व्यवस्थित होत नसल्यामुळे ते आता पडण्याच्या अवस्थेत आले आहे. पुरातत्व खात्याकडून याची देखभाल व दुरूस्ती होणे

पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : आरमोरी, वैरागडचे प्राचीन वैभवगडचिरोली : आरमोरी भागात अनेक ऐतिहासिक मंदिर, गडकिल्ले आहेत. परंतु यांची देखभाल व्यवस्थित होत नसल्यामुळे ते आता पडण्याच्या अवस्थेत आले आहे. पुरातत्व खात्याकडून याची देखभाल व दुरूस्ती होणे अपेक्षित आहे. परंतु या खात्याचे गडकिल्ले व मंदिराच्या संवर्धनासाठी प्रयत्न शून्य आहेत. तसेच या भागात स्वयंसेवी संघटनाही या कामी उदासिन आहेत. वैरागडचा किल्ला नागवंशीय माना शासकांच्या राजवटीतील असल्याचे मानले जाते. हा किल्ला तालुक्यातील खोब्रागडी व वैलोचना नद्यांच्या संगमावर आहे. वैरागड गावाच्या नावावरूनच या किल्यास वैरागड किल्ला म्हणून ओळखले जाते. इ.स.१३ व्या शतकात काही काळ देवगीरीच्या यादवांनीसुद्धा हा किल्ला स्वत:च्या ताब्यात घेतला होता. यादवानंतर या किल्यावर गोंडाचे राज्य आले. यादवांच्या सैन्यातील एक गोंड अधिकारी कोलभिल्ल याने गोंड समाज बांधवांना संघटित करून स्वत: किल्ला ताब्यात घेऊन राज्य कारभार करू लागला. माना नरेश कुरूमश्रुहीद याने बांधलेला हा किल्ला बहामणीच्या कारकिर्दीत इ.स.१४७४ मध्ये बहामणी सेनापती युसूफ आदिलखानने स्वारी करून किल्ला बराच उद्ध्वस्त केला. त्यानंतर याच जागी गोंड नरेश बाबाजी बल्लाळशहाने (इ.स.१५७२ ते १५९७) नवीन किल्ला बांधल्याचा उल्लेख मिळतो. परंतु त्याच किल्याची नंतर डागडुजी करून बाबाजी बल्लाळशहा यांनी उभारलेला किल्ला हा सुमारे १० एकर जागेत उभा आहे. किल्याची तटबंदीची भिंत हा काळ्या बेसाल्ट पाषाणातील असून आज ती बऱ्याच ठिकाणी मोडकळीस आलेली आहे. किल्ल्याच्या सभोवताल खोल खंदक असून तटाची भिंत सुमारे १५ ते २० फूट उंचीची आहे. त्यावर आता बरेच झाडे वाढलेले आहेत. या किल्याचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेस असून त्यास अन्य दोन प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वाराची स्थापत्यस्थिती फारशी चांगली नाही. त्यावर झाडे वाढलेली असून ते भग्नावस्थेत आहेत. आरमोरी येथील रामसागर तलावालागून असलेला शंभर वर्षापूर्वीचा हेमांडपंथीय किल्ला खचण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्याच्या दोनही बाजुला मोठ्या भेगा घेल्याने तो के व्हाही पडू शकतो, अशी त्याची अवस्था झाली आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये शिवमंदिर असून त्यात शिवाची मूर्ती आहे. आरमोरी शहरात हा एकमेव किल्ला आहे. परंतु त्याची डागडूजी झालेली नसल्याने तो शेवटच्या घटका मोजत आहे. (प्रतिनिधी)श