लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट आणि अॅग्रेरियन अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सिव्हिल लाईन्सच्या वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत अॅग्रेरियन अकॅडमीचे संस्थापक आणि संचालक सुधाकर राठोड यांनी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस परीक्षांच्या तयारीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत. त्यांची तयारी कशी करावी याबाबत त्यांनी तपशीलवार माहिती दिली. त्यांनी सांगितले की, प्रशासकीय नोकºयात चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज कुठे विचारल्या जाते. त्यांचा अभ्यासक्रम कसा असतो आणि त्यांची तयारी कशी केली पाहिजे.अभ्यासक्रम, प्रश्न आणि विश्वसनीय स्रोतावर त्यांनी भर दिला. विषयांचा अभ्यासक्रम कोणते वृत्तपत्र, मॅगझिन आणि वार्षिकांकातून करावा? याबाबत त्यांनी माहिती दिली. पाचवी ते बाराव्या वर्गात आणि अंडरग्रॅज्युएट विद्यार्थी हे लक्ष्य कसे प्राप्त करू शकतात, याबाबत त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचा शुभारंभ लोकमत समूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने झाला. संचालन पूनम तिवारी यांनी केले.पालकांनीही समजून घेतल्या सूक्ष्म बाबीकार्यशाळेत सुधाकर राठोड यांनी पालकांना यूपीएससी परीक्षेचे स्वरूप समजावून सांगितले. यासोबत सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किती परीक्षा आणि त्यात यश मिळाल्यानंतर प्राप्त होणाºया शासकीय पदांबाबत माहिती दिली. त्यांनी पालकांना सांगितले की, ते सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आयएएस, आयपीएस, आयएफएस जाणून घ्या आणि मुलांना अभ्यासाची सवय लावा. पालकांनी मुलांना वृत्तपत्र, मॅगझिन, वार्षिकांक वाचण्यासाठी प्रेरणा दिल्यास मुलांना नक्कीच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी पालकांपुढे व्यक्त केला.
‘करंट अफेअर्स, जनरल नॉलेज’ यशाचे सूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:42 IST
लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट आणि अॅग्रेरियन अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सिव्हिल लाईन्सच्या वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
‘करंट अफेअर्स, जनरल नॉलेज’ यशाचे सूत्र
ठळक मुद्देलोकमत कॅम्पस क्लब आणि अॅग्रेरियन अकॅडमीचे आयोजन : प्रशासकीय नोकºयांप्रति जागरूक झाले विद्यार्थी