शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

माजी विद्यार्थ्याने दिली अनोखी भेट! मेडिकल कॉलेजमधील तीन एकर उद्यानाचा करणार कायाकल्प

By सुमेध वाघमार | Updated: May 23, 2023 19:10 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त याच महाविद्यालयातील एका माजी विद्यार्थ्याने अनोखी भेट दिली आहे. डॉ. प्रमोद गिरी यांनी, महाविद्यालयातील तीन एकरांची बाग सुशोभित करण्याचे ठरवले आहे.

सुमेध वाघमारे 

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकल) हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे माजी विद्यार्थी पुढे येऊन महोत्सवाची एक-एक जबाबदारी घेत आहेत. यातीलच एका माजी विद्यार्थ्याने अधिष्ठाता कार्यालयासमोरील तब्बल ३ एकरचे उद्यान फुलविण्याची जबाबदारी घेतली आहे. ही बाग झाड-फुलांनी बहरली तर असेलच सोबतच येथील मोकळ्या वातावरणात बसून अभ्यास करण्याची, शिक्षक-विद्यार्थी एकत्र येऊन चर्चा करण्याचीही विशेष व्यवस्था असणार आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मेंदू शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख व न्युरॉन हॉस्पिटलचे संचालक प्रा. डॉ. प्रमोद गिरी त्या माजी विद्यार्थ्याचे नाव. मेडिकलचा परिसर २०० एकर परिसरात पसरला आहे. चार मोठी उद्याने हे या महाविद्यालयाचे वैशिष्ट आहे. जुन्या विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या आठवणींच्या कप्प्यात आजही अधिष्ठाता कार्यालयासमोरील ओवल गार्डन आहे. अंडाकृती आकारातील या उद्यानात पूर्वी थुईथुई करणारे कारंजे, चंदनाचे वृक्ष, विविध फुलांची झाडे हे आकर्षण होते. दरम्यानच्या काळात या उद्यानकडे दुर्लक्ष झाल्याने ओसाड पडले. परंतु आता अमृत महोत्सवाच्या निमित्ताने का होईना या उद्यानाला नवे रुप येणार आहे.

-गुरूकूल कन्सेप्टवर आधारीत उद्यानडॉ. गिरी म्हणाले, एकाच जागी बसून तासनतास अभ्यास करणाऱ्या विशेषत: वैद्यकीय विद्यार्थ्याला कंटाळा येणे साहजिकच आहे. तो घालविण्यासाठी मन रमण्यासाठी, बागेत बसून उभ्यास करता यावा, शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र बसून एखाद्या विषयावर चर्चा करावी यासाठी गुरुकूल कन्सेप्टवर आधारीत या उद्यानाची निर्मिती केली जाणार आहे.

-विविध जातीची झाडे, फुले ठरणार आकर्षणया उद्यानात विविध जातींची झाडे, फुलांचे ताटवे आकर्षण असणार आहे. या शिवाय, छोटे-छोटे शेड काढून तिथे सकाळी योगा, दुपारी शैक्षणिक चर्चा तर सायंकाळी गप्पागोष्टी करता येईल.

- साडे तीन महिन्यात उद्यानाचा कायापालटमेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या नेतृत्वात कॉलेजचा अमृत महोत्सव डिसेंबर महिन्यात आहे. त्या पूर्वी म्हणजे, पुढील साडे तीन महिन्यात या उद्यानाचा कायापालट करायचा आहे. जवळपास ३० लाखांचा खर्च अपेक्षीत आहे. मेडिकलने मला घडविले त्याची वेळोवेळी परतफेड करत आलो आहे, त्यात ही छोटीशी भेट असल्याचे डॉ. गिरी म्हणाले.

-माजी विद्यार्थ्यांचा पुढाकाराने मेडिकलचा कायापालट मेडिकल कॉलेज १९४७ पासून गुणवत्ताप्राप्त शिक्षक देत आहे. हे शिक्षक जगभरात आहेत. त्यांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा व अनुभवाचा फायदा रुग्णांसोबत वैद्यकीय विद्यार्थ्यांना होत आहे. अमृत महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी पुढे येऊन स्वत:हून वेगवेगळ्या कामाची जबाबदारी घेत आहे. उद्यानासोबतच क्लास रूम, सभागृह याचाही कायापालट होणार आहे.-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता मेडिकल

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय