शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री वडेट्टीवारांच्या सौभाग्यवतींना गंडा

By admin | Updated: August 12, 2016 02:48 IST

माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या घरी सोनामाता आल्याची बतावणी करून दोघांनी वडेट्टीवार ...

सोनामातेचे नाव : ६१ हजार रुपये उकळले नागपूर : माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या घरी सोनामाता आल्याची बतावणी करून दोघांनी वडेट्टीवार यांच्या सौभाग्यवतींना ६१,२०० रुपयांचा गंडा घातला. बुधवारी दिवसाढवळ्या ही घटना घडली. तब्बल १२ तासानंतर त्याची पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. चर्चेचे मोहोळ उडवून देणारी ही घटना बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत घडली. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार वडेट्टीवार रामदासपेठेतील एका तारांकित हॉटेलच्या मागे राहतात. त्यांच्या ‘कमलाई ’ या निवासस्थानी बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ५० वर्षे वयोगटातील एक महिला आणि एक पुरुष आला. पुरुषाने ही महिला म्हणजे साक्षात सोनामाता आहे, असे सांगून बंगल्यात प्रवेश मिळवला. वडेट्टीवार सोनामातेचे नि:सीम भक्त आहे. त्यामुळे किरण विजय वडेट्टीवार (वय ४३) यांनी त्यांचा आदरसत्कार केला. महिलेने घरगुती स्वरूपाचे चमत्कार दाखवले. त्यामुळे किरण वडेट्टीवार यांचा विश्वास जास्तच वाढला. महिलेने ‘साहेब’ बाहेरगावी गेले. त्यांच्याकडे लवकरच मोठी जबाबदारी येणार असून, सर्वत्र नाव होईल, अशी बतावणी केली तर, सोबतच्या व्यक्तीने साहेबांनी (वडेट्टीवार) ५१ हजारांची दक्षिणा ठेवण्यास सांगितले होते, अशी बतावणी केली. वडेट्टीवार यांनी सांगितल्यामुळे खातरजमा करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, वडेट्टीवार गडचिरोलीच्या दौऱ्यावर असल्याने संपर्क झाला नाही. इकडे महिलेचे चमत्कार बघून किरण वडेट्टीवार आणि त्यांच्या मुलीची श्रद्धा अढळ झाली. त्यांनी त्या महिलेसमोर ५१ हजार रुपये ठेवले. सोबतच्या पुरुषाने मुलांच्या नावाने काही दान करा, असे म्हटले. त्यामुळे मुलीने स्वत:चे ५६०० आणि पुन्हा दुसरे ५६०० असे एकूण ११,२०० रुपये ठेवले. अशा प्रकारे एकूण ६१,२०० रुपये घेऊन कथित माता आणि तिच्यासोबतची व्यक्ती निघून गेली. फोन आला, खुलासा झाला काही वेळेनंतर विजय वडेट्टीवार यांच्याशी घरच्यांचा फोनवरून संपर्क झाला. ‘सोनामाता घरी आल्या होत्या. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना ६१,२०० रुपये दिल्याचे सांगितले. वडेट्टीवार यांनी आपण असे काही सांगितलेच नाही, म्हटल्यामुळे किरण यांना फसगत झाल्याचे ध्यानात आले. या घटनेची तक्रार करावी की नको, अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या किरण वडेट्टीवार यांनी रात्री १० च्या सुमारास सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून लगेच चौकशी करून घेतली. त्यानंतर रात्री उशिरा फसवणुकीच्या आरोपाखाली ‘त्या’ दोघांविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक कांडेकर यांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, प्रकरण माजी मंत्र्यांशी संबंधित असल्याने याबाबत दिवसभर गोपनीयता बाळगण्यात आली होती, हे विशेष !