शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रोडच्या चौकशीसाठी समिती गठित करा

By admin | Updated: May 9, 2017 02:07 IST

विकास कामांना आमचा विरोध नाही. परंतु शहरातील सिमेंट रोडच्या गुणवत्तेबाबत आक्षेप घेण्यात आलेले आहेत.

विरोधकांची मागणी : भेगा डांबराने भरण्याच्या जिओटेकेच्या सूचना होत्या का?लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास कामांना आमचा विरोध नाही. परंतु शहरातील सिमेंट रोडच्या गुणवत्तेबाबत आक्षेप घेण्यात आलेले आहेत. काही रोडवरील भेगा डांबराने भरण्यात आलेल्या आहेत. त्या जिओटेकच्या सूचनानुसार संंबंधित कंत्राटदारांनी भरलेल्या आहेत का, काम दर्जेदार होते तर पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार वेस्ट हायकोर्ट रोडवरील गट्टू का बदलण्यात आले, असे प्रश्न निर्माण झाले आहे. सिमेंट रोडची कामे दर्जेदार होण्यासाठी या कामाची तपासणी करण्यासाठी समिती गठित करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली.विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी सिमेंट रोडचा प्रश्न उपस्थित केला. शहरातील सिमेंट रस्ते नागरिकांच्या पैशातून होत आहे. परंतु यात भ्रष्टाचार होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. इंडियन रोड काँग्रेसच्या म्हणण्यानुसार सिमेंट रोड उन्हामुळे प्रसरण व आकुंचन पावतात. यामुळे भेगा पडतात. सिमेंट रोडच्या नमुन्यांची तपासणी जिओटेक संस्थेमार्फत केली जाते. यात कोणत्याही प्रकारची अनियमितता नाही. कामे दर्जेदार होत असल्याचा दावा सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी केला. सिमेंट रोडला काही ठिकाणी सहा इंचाच्या भेगा गेलेल्या आहेत. हे निकषात बसते का, असा प्रश्न उपस्थित करून दुनेश्वर पेठे यांनी रोडची कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप केला. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार वेस्ट हायकोर्ट सिमेंट रोडचे निकृष्ट ब्लॉक काढण्यात आले आहे. जिओटेक संस्थेकडून नमुन्यांची तपासणी केली जाते अशी माहिती मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली. नागपूर शहरात पहिल्या टप्प्यात ३० रोडच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील १२ रोडचे काम पूर्ण झाले असून चार रोडची कामे प्रगतिपथावर आहे. दुसऱ्या टप्प्यात ५९ रोडची कामे करावयाची आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा कालावधी २६ जानेवारी २०१८ पर्यंत आहे. यातील ३३ रोडची कामे प्रगतिपथावर आहे. मे महिन्यातील तापमान, भूमिगत केबलचे नेटवर्क बदलणे, यामुळे कामाला विलंब होत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता मनोज तालेवार यांनी दिली. सिमेंट रोडच्या प्रकरणात नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी सभागृहात दिले. सिमेंट रोडच्या चर्चेत अन्य सदस्यांनीही सहभाग घेतला.वाठोडा रिंगरोडवरील स्वामी नारायण मंदिर येथील पूल व रोडचे रुं दीकरणाचे काम करताना पाणी पुरवठ्याच्या लाईन तोडण्यात आल्यात. यात महापालिके चे १६ लाखांचे नुुकसान झाले. परंतु महापालिकेने संबंंधित कंत्राटदारांवर कारवाई केली नसल्याचा मुद्दा धर्मपाल मेश्राम यांनी उपस्थित केला.काही भागात दिवसाआड पाणी शहरातील नागरिक ांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी २४ बाय ७ योजना राबविली जात आहे. परंतु शहरातील अनेक वस्त्यांना आजही एक दिवसाआड पाणी मिळते. कुठे २० मिनिटे तर काही वस्त्यांना अर्धातास पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्याचे संजय महाकाळकर यांनी निदर्शनास आणले. यावर तातडीने उपायोजना करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. राज्य सरकारकडून ९५ कोटी मिळालेशहरातील नागरिकांना अखंडित पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली. परंतु निधीची अडचण होती. आता शासनाकडून या योजनेसाठी ९५ कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. जलप्रदाय विभागाची बैठक आयोजित करून निर्धारित कालावधीत कामे पूर्ण होतील अशी ग्वाही आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. लोकमतने वेधले लक्ष शहरातील निकृष्ट दर्जाचे सिमेंट रोड, संथ काम व होणारी वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या संदर्भात लोकमतने वृत्तमालिका प्रकाशित करून सर्वप्रथम महापालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले होते. शासन दरबारी हा प्रश्न लावून धरला. यातूनच जनमंचने पब्लिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. अखेर लोकमतच्या वृत्त मालिकेची दखल घेत महापालिका प्रशासनाने चौकशी सुरू केली. सोमवारी सभागृहातही सदस्यांनी सिमेंट रोडचा मुद्दा लावून धरीत चौकशीसाठी समिती गठित करण्याची मागणी केली.