शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा नसल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर : सरसंघचालक मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 11:08 IST

शेकडो वर्षांपासून ज्या परंपरा चालत होत्या, त्यांना आपण नाकारू शकत नाही. ते त्यांच्या जागी योग्य असतील. त्याचा अनुभव घेणे आवश्यक ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवेदांना नाकारणे हा अतिवादीपणाच

नागपूर : वेद आपल्या परंपरेतील मौलिक ठेवा असून, त्यात भौतिक व आध्यात्मिक ज्ञानाचे भांडार आहे. वस्तुत: हे ज्ञान सुरुवातीपासूनच सर्वांसाठी वाटायला हवे होते. मात्र, या ज्ञानाची सूत्रे मर्यादित वर्गाच्या हातात होती. त्यांच्या हाती आले तेवढे ज्ञान वाचले. जर तेव्हाच सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा मिळाली असती तर वेदांचे ज्ञान पूर्णत: संग्रहित झाले असते. मात्र, असे न झाल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर पडला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. धात्रे नम: ट्रस्टतर्फे आयोजित ‘वेदिक फिलॉसॉफिकल रेमिडिज’ या पुस्तक प्रकाशनादरम्यान ते गुरुवारी बोलत होते.

अहल्या मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, लेखक डॉ. चेन्ना केशव शास्त्री प्रामुख्याने उपस्थित होते. जे मुळात वैज्ञानिक आहेत, त्यांना विज्ञानापलीकडेदेखील जगात खूप काही आहे याची जाणीव आहे. काही लोक वेदांना नाकारतात, तर काही विज्ञानाला नाकारतात. मात्र, हे दोन्ही अतिवादी प्रयोग आहेत. असे केल्याने असंतुलन निर्माण होते व त्यातून विकृती निर्माण होते. याचे परिणाम समाजासाठी घातक असतात. आपल्या परंपरेतील ज्ञानाचे अंश अतिवादीपणामुळे नाकारले गेले. आपणदेखील त्यांना मान्य केले. त्यामुळे बरेचसे पारंपरिक ज्ञान लुप्त झाले. परकीय शक्तींना याचा फायदा घेतला व आपल्या मनात आपल्याच ज्ञानाबाबत न्यूनगंड निर्माण झाला, असे सरसंघचालक म्हणाले.

शेकडो वर्षांच्या परंपरा नाकारू शकत नाही

विज्ञान व अध्यात्म हे परस्परविरोधी आहे हा अतिवादी दृष्टिकोन अयोग्य आहे. या दोन्ही बाब परस्परपूरक असू शकतात. विज्ञानातून या गोष्टी हळूहळू समोर येत आहेत. शेकडो वर्षांपासून ज्या परंपरा चालत होत्या, त्यांना आपण नाकारू शकत नाही. ते त्यांच्या जागी योग्य असतील. त्याचा अनुभव घेणे आवश्यक ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वेदांमधील वर्णनातून ड्राय सेलची निर्मिती

आपले वेद ज्ञानाचे भंडार आहेत. आत्मसाक्षात्कारापासून ते अगदी शिल्पकलेपर्यंतची सूत्रे त्यात आहे. वेदिक गणित आज जगातील मोठ्या विद्यापीठांमध्ये शिकविले जात आहे. विज्ञान भारतीच्या काही संशोधकांनी वेदांमधील वर्णनातून ड्राय सेल तयार केले होते, असे सरसंघचालकांनी सांगितले.आजचे जग ज्या भाषेत समजते, त्या भाषेत ती मांडायला हवी.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ