शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या पत्राचा राज्य शासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 10:43 IST

केंद्र शासनाने जैवविविधता नोंदवहीचा मोबदला १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. मात्र राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे याबाबत कुठलेच दिशानिर्देश जारी झाले नसल्याने काम थंडबस्त्यात गेले आहे.

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे स्थापन जैवविविधता समित्यांमार्फत स्थानिक पातळीवरील जैवविविधता नोंदणीचे काम सामाजिक संस्थांद्वारे करण्यात आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून निधीच न मिळाल्याने नोंदणीचा पैसा थकला आहे. दरम्यान, केंद्र शासनाने जैवविविधता नोंदवहीचा मोबदला १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले. मात्र राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे याबाबत कुठलेच दिशानिर्देश जारी झाले नसल्याने काम थंडबस्त्यात गेले आहे. दुसरीकडे जबाबदारी असलेल्या जैवविविधता महामंडळानेही हात वर केल्याचे दिसून येत आहे.जैवविविधता मंडळाद्वारे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर जैवविविधता नोंदवही तयार करण्यात येते. संस्थांच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या निगराणीखाली हे सामाजिक संस्थांच्या मार्फत कामाची अंमलबजावणी केली जाते. स्थानिक पातळीवर कोणत्या प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, पाण्याचे स्रोत आदींची नोंद केली जाते. जैवविविधता अधिनियम २००२ अंतर्गत मंडळाच्या माध्यमातून २०१९ मध्ये लोक जैवविविधता नोंदवहीचे अभियान राबविण्यात आले. मंडळानेही सर्वेक्षणाचे काम सामाजिक संस्थांकडून करवून घेतले. मात्र शासनाकडून निधीच न मिळाल्याने संस्थांच्या कामाचा पैसा रखडला. मंडळाने निधीसाठी राज्य शासनाकडे विचारणा करीत स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या निधीतून जैवविविधता नोंदवहीचा मोबदला देण्याचे निवेदन दिले होते. मात्र संस्थांकडे निधीच नसल्याने त्यांनीही हात वर केले. याबाबत ‘लोकमत’ने २१ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत सामाजिक संस्थांनी पाठपुरावा केला.

या वृत्तामुळे यंत्रणा कामाला लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासनानेही या महत्त्वपूर्ण कामाचा मोबदला व नोंदवहीचे उरलेले काम १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पूर्ण करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाला दिले आहेत. मात्र राज्याच्या मंत्रालयाने यासंदर्भात कोणतेही दिशानिर्देश जारी केले नाही. सूत्राच्या माहितीनुसार ग्रामपंचायतांना १५ व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र राज्याकडून कुठलेही दिशानिर्देश नसल्याने व्यवस्थापन समित्यांनीही नोंदवहीच्या मोबदल्याची पूर्तता करण्यास मनाई केली आहे. नोंदवहीचा मोबदला न मिळाल्याने सामाजिक संस्था अडचणीत आल्या आहेत. अनेक संस्थांनी याबाबत लोकमतला माहिती दिली.जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक संस्थानागपूर जिल्ह्यात अशा ५० पेक्षा अधिक सामाजिक संस्थांनी जैवविविधता नोंदवहीचे काम केले आहे. राज्यभरातही अशा अनेक संस्थांचा मोबदला रखडला असून त्यांना निधीची प्रतीक्षा लागली आहे.मंडळाच्या कामावरही संशयस्वराज्य संस्थांच्या जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन झाल्यानंतर त्यांचे खाते उघडले जाते व जैवविविधता मंडळ या खात्यावरच निधी जमा करते. मंडळाने जैवविविधता नोंदवहीचे काम करवून घेतले पण पैसा जमा केला नसल्याची तक्रारही करण्यात येत असून मंडळानेच पैसा रोखल्याचा संशय सामाजिक संस्थांनी व्यक्त केला आहे.

 

टॅग्स :Governmentसरकार