शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागात ‘त्या’ ट्रकचा गोलमाल!

By admin | Updated: September 27, 2015 02:26 IST

वन विभागाने गाजावाजा करीत पकडलेला सागाच्या लाकडाचा ट्रक केवळ पाच हजार रुपयांचा दंड वसूल करू न सोडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जप्तीचे नाट्य उघड : वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह नागपूर : वन विभागाने गाजावाजा करीत पकडलेला सागाच्या लाकडाचा ट्रक केवळ पाच हजार रुपयांचा दंड वसूल करू न सोडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बुटीबोरी येथील वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश ठेंगडी यांनी मागील ३१ आॅगस्ट रोजी रात्री १.३० वाजता कमालीचा तामजाम करू न ट्रक क्र. टीएन ५२ / एच/ ६१२७ हा पकडला होता. त्या ट्रकमध्ये कापशी खुर्द (बुदरुक) येथील शिवशक्ती टिंबर कॉर्पोरेशन येथून माल भरू न तो विना वाहतूक परवाना केरळमधील कैराली टिंबर विठानसेरी निंबारा पालखड येथे नेण्यात येत होता. परंतु ठेंगडी यांनी तो ट्रक बुटीबोरी येथील वन उपज तपासणी नाक्यावर रात्री १.३० वाजता पकडला होता. त्या ट्रकमध्ये बाभळीच्या लाकडात लाखो रुपयांचे सागवान लपवून नेले जात होते. या कामगिरीसाठी ठेंगडी यांचे कौतुकही करण्यात आले. मात्र काहीच दिवसांत त्या ट्रक मालकांकडून केवळ पाच हजार रुपयांचा दंड वसूल करू न, तो ट्रक सोडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. वन अधिकारी नियमानुसार संबंधित ट्रक मालकांकडून दंड वसूल करू न ट्रक सोडण्यात आल्याचे सांगत आहेत. मात्र एखादी सामान्य व्यक्ती केवळ सागाच्या एका दांडीसह पकडली गेली, तरी त्याच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करू न, त्याला कारागृहात डांबले जाते. परंतु या प्रकरणात लाखो रुपयांचे सागवान पकडण्यात आले असताना ते केवळ पाच हजार रुपयांत सोडण्यात आले. यासाठी ते सागवान ‘इम्पोर्टेड’ दाखवून, वरिष्ठांची परवानगी प्राप्त करण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर त्यासाठी स्वत: संंबंधित वनाधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका वठविल्याची माहिती आहे. वन विभागातील काही जाणकारांनी ते सागवान ‘इम्पोर्टेड’ नसल्याचा दावा केला आहे. यावरू न केवळ ट्रकच्या जप्तीचे नाट्य रंगविण्यात असल्याचे दिसून येत आहे. तसेच वन अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे.पकडण्यात आलेल्या ट्रकमध्ये चिरान सागाचे ८४४ नग म्हणजे, १०.७९६ घनमीटर माल आढळून आला. खुल्या बाजारात या सर्व सागाची किंमत सुमारे ८ ते १० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. याशिवाय ट्रकमध्ये आडजात बाभळीचे ५९३ नग आढळून आले होते. दरम्यान वन अधिकाऱ्यांनी त्या ट्रकसह त्याचा चालक बालसुब्रमण्यम कुप्पूस्वामी (वय २८ वर्षे) रा. इरुसामापट्टी चेन्नागिरी (केरळ) याला ताब्यात घेतले होते. यानिमित्ताने मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सागवान लाकडाच्या तस्करीचा भंडाफोड झाला होता. शिवाय यातून मोठे रॅकेट पुढे येईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र काहीच दिवसांत त्या सर्व अपेक्षा फोल ठरल्या.(प्रतिनिधी)