शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वन अधिकाऱ्यांनी झाडांची केली कत्तल

By admin | Updated: March 8, 2017 02:39 IST

एका वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जंगलात मातीबांध तयार करण्यासाठी चक्क जेसीबीच्या मदतीने झाडांची कत्तल

भ्रष्टाचाराचा आरोप : गावकऱ्यांची वरिष्ठांकडे लेखी तक्रार नागपूर : एका वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जंगलात मातीबांध तयार करण्यासाठी चक्क जेसीबीच्या मदतीने झाडांची कत्तल केल्याच्या गंभीर आरोपासह काही गावकऱ्यांनी थेट राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) आणि पेंचचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. विशेष म्हणजे, या लेखी तक्रारीसोबत ३५ गावकऱ्यांच्या स्वाक्षरीसह नावांची यादी जोडण्यात आली आहे. आरएफओ पी. एस. पाखले असे त्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्याचे नाव असून, ते सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पवनी (बफर झोन) येथे कार्यरत आहेत. गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार, आरएफओ पाखले यांनी मागील २०१६ मध्ये पिपरिया येथील नर्सरीतील पॉलीबॅग भरण्यासाठी सरकारी जंगलातील रेती व मातीचा उपयोग करून त्याचे लाखो रुपये स्वत: हडप केले. तसेच नेटचे शेड तयार करण्यासाठी जंगलातील हिरवे बांबू तोडून त्याचा उपयोग करण्यात आला. शिवाय मजुरांना नियमाप्रमाणे ३०३ रुपये मजुरी देणे आवश्यक असताना त्यांना हुंडा पद्घतीने मजुरी देऊन त्यात लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोबतच १ जुलै २०१६ रोजी राज्यभरात राबविण्यात आलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत येथे १० हजार खड्डे खोदण्यात आले होते. परंतु त्यातही पाखले यांनी मजुरांना खड्डा खोदण्याचा दर जास्त असताना केवळ १० रुपये प्रति खड्डा मजुरी दिल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय जंगलात आवश्यकता नसताना तब्बल २० ते २५ बोअरवेल खोदून त्यात ठेकेदारांकडून कमिशन वसूल केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अशा अनेक गंभीर आरोपांसह गावकऱ्यांनी संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या गंभीर आरोपानंतरही वनभवन आणि पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने गावकऱ्यांच्या त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.(प्रतिनिधी) आरएफओ म्हणतात, सर्व आरोप खोटे यासंबंधी वन परिक्षेत्र अधिकारी पी. एस. पाखले यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू ऐकून घेतली असता, त्यांनी गावकऱ्यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला. शिवाय ते पुढे म्हणाले, गावकऱ्यांच्या या तक्रारीनंतर पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील सहायक वनसंरक्षक भागवत यांनी विचारपूस केली. परंतु त्यांना काहीही तथ्य आढळून आले नाही. उलट तक्रारीतील गावकऱ्यांची काही नावे आणि स्वाक्षऱ्या या खोट्या असल्याचाही यावेळी पाखले यांनी आरोप केला.