शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वन मुख्यालयाचा क्लर्क पॉझिटिव्ह: विभागात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 22:33 IST

वन मुख्यालयात कार्यरत एका ४५ वर्षीय क्लर्कला कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे नुकतीच या मुख्यालयाच्या रोखपालाचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आणखी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने वन कर्मचारी व अधिकाऱ्यांची धास्ती वाढली आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाने घेतले सोबतच्या कर्मचाऱ्यांचे नमुने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वन मुख्यालयात कार्यरत एका ४५ वर्षीय क्लर्कला कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे नुकतीच या मुख्यालयाच्या रोखपालाचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आणखी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने वन कर्मचारी व अधिकाऱ्यांची धास्ती वाढली आहे.रविवारी वनविभागाच्या पब्लिसिटी शाखेचा रोखपालांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. दुपारी त्यांचा अहवालात ते कोविड संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना होम क्वारंटाईन राहण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय मुख्यालयातील प्रत्येक विभागाच्या केवळ एका कर्मचाऱ्याला उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले. सूत्राच्या माहितीनुसार, मृत कर्मचाऱ्यावर किडनीचे उपचार सुरू होते. यामुळे वन विभागाच्या बजेट विभागात क्लर्क म्हणून कार्यरत त्यांचे मित्र त्यांना रुग्णालयात घेऊन जायचे. दरम्यान, गुरुवारी संबंधित क्लर्कचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक वन मुख्यालयात पोहचले. त्यांनी बजेट विभागात कार्यरत ७-८ कर्मचाऱ्यांचे स्वॅब सॅम्पल जमा केले. या नमुन्यांचा अहवाल शनिवारी येण्याची शक्यता आहे.अहवाल पाहून घेणार पुढचा निर्णयप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) डॉ. एन. रामबाबू यांनी सांगितले, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बजेट विभागाच्या कर्मचाऱ्यांची रिपोर्ट शनिवारी प्राप्त होईल. त्या सर्वांचा अहवाल पाहिल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वन मुख्यालयाला सॅनिटाईझ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मनपाचे आरोग्य अधिकारीही ‘पॉझिटिव्ह’मनपा धरमपेठ झोनचे आरोग्य अधिकारीही कोविड-१९ पॉझिटिव्ह आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य अधिकारी राहत असलेल्या कॉलनीतील एक व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना एम्समध्ये भर्ती करण्यात आले आहे. दरम्यान, धरमपेठ झोन येथील त्यांच्या विभागाला सॅनिटाईझ करण्यात आले. यासोबत त्यांच्या संपर्कात आलेल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. परंतु कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागcorona virusकोरोना वायरस बातम्या