नागपूर : वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी वनरक्षक व वनपालाच्या विविध समस्येवर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी वनभवनात चर्चा केली. यावेळी राज्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे सचिव श्रीवास्तव, मुख्य वनसंरक्षक पी.एन. मुंडे उपस्थित होते. वनरक्षक व वनपालाच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याची मागणी पाटील यांनी केली. यासंदर्भातील निवेदन वनमंत्र्यांना दिले. निवेदनात विश्रामगृहाची बांधणी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी सुविधा या मागण्यांचाही समावेश होता. वेतनश्रेणीत सुधारणा करून जानेवारी २०१५ पर्यंत लाभ देण्याचे आश्वासन वनमंत्र्यांनी दिले. तसेच पदनामात त्वरित बदल करण्याचे व गणवेशाकरिता निधी देण्याबाबत निर्देश वनमंत्र्यांनी दिले. यावेळी संघटनेचे आर. बी. धोटे, ए. के. मडावी, के. जे. बन्सोड, डी. जी. कुशवाह, के.जे. चव्हाण, सुधीर हाते आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वनरक्षक, वनपालांना सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळणार
By admin | Updated: December 24, 2014 00:45 IST