शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मेयो हॉस्पीटलचा न्यायवैद्यक विभाग झाला ‘पेनलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 10:04 IST

मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचा स्वीकार करत हा विभाग ‘डिजिटल’ केला. विशेषज्ञाची स्वाक्षरीही ‘डिजिटल’ केल्याने विभागच आता ‘पेनलेस’ झाला आहे.

ठळक मुद्दे‘डिजिटलायझेशन’मुळे एक दिवसात अहवाल

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपघात, गुन्ह्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून कारणांची मीमांसा केली जाते. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालापासून ते लैंगिक अत्याचार तपासणीपर्यंतचा अहवाल द्यायला उशीर व्हायचा. तपास यंत्रणेसोबतच मृताच्या नातेवाईकांना न्यायवैद्यक विभागाच्या चकरा माराव्या लागायच्या, हाताने अहवाल तयार केला जात असल्याने भविष्यात त्यात बदल करण्याचा धोकाही असायचा, याची दखल मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींचा स्वीकार करत हा विभागच ‘डिजिटल’ केला. विशेष म्हणजे, विशेषज्ञाची स्वाक्षरीही ‘डिजिटल’ केल्याने विभागच आता ‘पेनलेस’ झाला आहे.न्यायवैद्यक विशेषज्ञामार्फत तयार केला जाणारा मरणोत्तर तपासणी संबंधित पोलिसांना सुपूर्द केला जातो. पोलीस ठाण्यांमार्फत हा अहवाल नातेवाईकांना उपलब्ध करून दिला जातो. विमा कंपन्या, नुकसान भरपाई दावे तसेच न्यायालयीन कामकाजासाठी हा दस्तऐवज महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र अनेकदा हे अहवाल तयार होण्यास विलंब होतो. त्यामुळे नातेवाईक, पोलिसांची सतत मेयोकडे विचारणा व्हायची. पोलिसांकडून त्यासाठी अनेकदा मेयोत चकरा देखील मारल्या जात होत्या. या शिवाय, तात्पुरता मरणोत्तर तपासणी अहवाल, अवजार तपासणी अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, वयाचा दाखला, लैंगिक अत्याचाराचा तपासणी अहवालसह विसेरा फॉर्म, हिस्टोपॅथालॉजी फॉर्म भरायला आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागायचा. ही दिरंगाई टाळण्यासाठी न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी हा विभागच ‘डिजिटल’ करण्याचा प्रस्ताव तयार केला. १९ लाख खर्च अपेक्षित असलेल्या या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. ‘इंटरप्राईस रिसोर्सेस प्लॅनिंग’ कंपनीने हाती घेतलेले हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. यामुळे न्यायवैद्यक विभागाच्यावतीने देण्यात येणारा अहवाल संबंधित विभागाला त्याच दिवशी मिळेल. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे.

आॅनलाईन व आॅफलाईन सर्व्हर असणारया प्रकल्पाविषयी माहिती देताना डॉ. व्यवहारे म्हणाले, या प्रकल्पाचे ‘सर्व्हर’ ‘आॅनलाईन’ व ‘आॅफलाईन’ असणार आहे. ‘आॅफलाईन सर्व्हर’ अधिष्ठात्यांकडे असेल तर ‘आॅनलाईन सर्व्हर’ विभाग प्रमुखांकडे असेल. यामुळे एखाद्यावेळी दुर्घटनेत ‘आॅनलाईन सर्व्हर’ नष्ट झाले तरी ‘आॅफलाईन सर्व्हर’मधून संपूर्ण डेटा मिळू शकेल. यामुळे वर्षाेनवर्षे मरणोत्तर तपासणी संबंधिची प्रत्येक माहिती उपलब्ध असणार आहे.

अहवालावर ‘डिजिटल’ स्वाक्षरीपूर्वी मृत्यू प्रमाणपत्र महापालिकेच्या संबंधित विभागाला पोहचायलाच ८-१० दिवसांचा कालावधी लागायचा. परंतु आता मृत्यू प्रमाणपत्र त्याच दिवशी मेलने पाठविले जाणार आहे. या प्रमाणपत्रासह अन्य सर्व अहवालावर विशेषज्ञाची ‘डिजिटल’ स्वाक्षरी असणार आहे. यामुळे भविष्यात अहवालात खाडाखोड होण्याची शक्यता पूर्णत: मावळली आहे, अशी माहितीही डॉ. व्यवहारे यांनी दिली.

१२ संगणकांची मदत‘इंटरप्राईस रिसोर्सेस प्लॅनिंग’ कंपनीच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या या प्रकल्पात अत्याधुनिक १२ संगणकांची मदत घेण्यात आली आहे. हे संगणक एकमेकांशी जोडले आहेत. यात पोलिसांच्या पंचनाम्यापासून ते १६ कलमी फॉर्म स्कॅन करून आहेत. विशेषज्ञांना केवळ यातील रिकाम्या जागा भराव्या लागणार असल्याने वेळ वाचून अहवाल लवकर तयार होईल.

टॅग्स :Healthआरोग्य