शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

‘दहाच्या आत’ची सक्ती

By admin | Updated: June 4, 2016 02:55 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) विद्यार्थिनींच्या दहा वाहनांना गुरुवारी पहाटे पेटवून दिल्याने खळबळ उडाली.

मुलींच्या वसतिगृहात लागले सीसीटीव्ही : वाहन पेटवल्याची करणार चौकशी नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) विद्यार्थिनींच्या दहा वाहनांना गुरुवारी पहाटे पेटवून दिल्याने खळबळ उडाली. वसतिगृह क्रमांक दोनमध्ये घडलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण मेडिकल हादरले आहे. या प्रकरणाची चौकशी अजनी पोलीस करीत असले तरी यातील गांभीर्य लक्षात घेऊन मेडिकल प्रशासनानेही आपल्या स्तरावर चौकशी सुरू केली आहे. सोबतच रात्री १० वाजतानंतर वसतिगृहातील सर्व प्रवेशद्वार बंद करण्याच्या नियमांचे सक्तीने पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.अधिष्ठाता कार्यालयाच्या अगदी जवळ हे मुलींचे वसतिगृह आहे. वसतिगृहाचे प्रवेशद्वार बंद असताना आत उभ्या केलेल्या दुचाकींना पहाटे २.३० वाजताच्या सुमारास आग लावण्यात आली. या आगीत ५० वर दुचाकी जळाल्या असत्या परंतु मुलींनी तत्काळ इतर दुचाकी हटविल्याने आग आटोक्यात राहिली. या घटनेला मेडिकल प्रशासनाने सुरुवातीला गंभीरतेने घेतले नव्हते, परंतु चर्चा वाढताच शुक्रवारी चौकशीला सुरुवात केली. विशेष म्हणजे, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन्ही मुलींच्या वसतिगृहात २४ तासांच्या आत सीसीटीव्ही बसविले. तसेच तेथील सामान्य सुरक्षा रक्षक काढून त्या जागी निवृत्त सैनिकांच्या सुरक्षा रक्षकांची कंपनी असलेल्या मॅस्कोचे रक्षक तैनात केले. या सोबतच रात्री १० वाजतानंतर प्रवेशद्वार बंद करण्याच्या सूचनाही सुरक्षा रक्षकांना देण्यात आल्या. यामुळे रात्री उशिरापर्यंत वसतिगृहाच्या बाहेर राहणाऱ्यांवर याचा वचक बसणार आहे. शनिवारपासून संरक्षण भिंतीच्या डागडुजीला सुरुवात होत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी दिली. शुक्रवारी अजनी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करीत दुचाकी जळालेल्या विद्यार्थिनींची चौकशी केल्याचे समजते. (प्रतिनिधी)