शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

नासुप्र योजना हस्तांतरणास मनाई करा : हायकोर्टात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 19:46 IST

नागपूर सुधार प्रन्यासच्या योजना, मालमत्ता व निधी महानगरपालिका आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना हस्तांतरित करण्यास मनाई करण्यात यावी अशा विनंतीसह सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.

ठळक मुद्दे२७ ऑगस्टच्या अधिसूचनेला आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या योजना, मालमत्ता व निधी महानगरपालिका आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना हस्तांतरित करण्यास मनाई करण्यात यावी अशा विनंतीसह सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. तसेच, नागपूर सुधार प्रन्यासकडून नियोजन प्राधिकरणचा अधिकार काढून घेणाऱ्या अधिसूचनेच्या वैधतेला आव्हान दिले आहे.नासुप्र बरखास्तीविरुद्ध दत्ता यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्या याचिकेत न्यायालयाने १३ जून २०१८ रोजी आदेश जारी करून नासुप्र योजनांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली आहे. असे असताना वादग्रस्त अधिसूचना काढण्यात आल्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला असे दत्ता यांनी अर्जात नमूद केले आहे. अर्जावर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अर्जदाराचे वकील अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ३ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.नासुप्रचे स्वत:चे स्वतंत्र बजेट आहे. राज्य सरकारने आतापर्यंत विविध प्रकल्पांकरिता नासुप्रकडून निधी घेतला आहे. परंतु, तो निधी परत करण्यात आला नाही. २० ऑक्टोबर २०१८ रोजी नासुप्रचे विविध प्रकल्प नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. २३ मे २०१६ रोजी अनधिकृत ले-आऊट नियमित करण्यासाठी नासुप्रच्या निधीतून १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. अमृत योजनेसाठी नासुप्रकडून ११३.३५ कोटी रुपयांचा वाटा घेण्यात आला. हे सर्व नासुप्र बरखास्तीसाठी करण्यात येत आहे. वादग्रस्त अधिसूचना गेल्या २७ ऑगस्ट रोजी काढण्यात आली आहे. ती अधिसूचना अवैध ठरवून रद्द करण्यात यावी असेही दत्ता यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास