शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी वकिलांनो नियम पाळा !

By admin | Updated: June 2, 2016 03:14 IST

अनेक सरकारी वकील न्यायालयात व कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहात नसल्याचे, न्यायालयात वेळेवर येत नसल्याचे आणि न्यायालयीन कामकाजात सहभागी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

शासनाने दिली समज : अनेकदा न्यायालयात राहतात अनुपस्थितराकेश घानोडे  नागपूरअनेक सरकारी वकील न्यायालयात व कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहात नसल्याचे, न्यायालयात वेळेवर येत नसल्याचे आणि न्यायालयीन कामकाजात सहभागी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील काही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी यासंदर्भात शासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने ही बाब गंभीरतेने घेऊन सरकारी वकिलांच्या बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. त्याद्वारे सरकारी वकिलांना नियम पाळण्याची समज देण्यात आली आहे.राज्य शासनाने उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालये, विविध न्यायाधिकरणे यासह अन्य न्यायालयांमध्ये शासनाशी संबंधित प्रकरणांचे कामकाज पाहण्यासाठी वकील नियुक्त केले आहेत. या वकिलांना आकर्षक पारिश्रमिक दिले जाते. असे असतानाही अनेक सरकारी वकील नियम पाळत नाहीत. त्यांच्या बेशिस्तीमुळे प्रकरणांचे कामकाज विनाकारण लांबते. न्यायालयाच्या अमूल्य वेळेचा अपव्यय होतो. तसेच, दूर अंतरावरून आलेल्या पक्षकारांची आर्थिक हानी होते व त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. संबंधित परिपत्रक शासनाच्या विधी व न्याय विभागाने ३० मे रोजी जारी केले आहे. न्यायालयीन प्रकरणे विनाविलंब चालविण्यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालयात व कार्यालयात वेळेवर आणि पूर्णवेळ उपस्थित राहणे अनिवार्य असल्याची सूचना परिपत्रकात करण्यात आली आहे. राज्याचे महाधिवक्ता, सर्व विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयांतील सरकारी वकील आदींकडे परिपत्रक पाठविण्यात आले आहे. नियम पाळणे वकिलांचे कर्तव्यनियम पाळणे सरकारी वकिलांचे कर्तव्यच आहे. यामुळे त्यांनी न्यायालयात व कार्यालयात वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे. तसेच, त्यांनी खटले वेगात निकाली काढण्यासाठी न्यायालयाला सहकार्य केले पाहिजे. शासनाच्या परिपत्रकाचे स्वागत करतो. नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकिलांना वेळेवर उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली आहे. - अ‍ॅड. विजय कोल्हे, मुख्य जिल्हा सरकारी वकील.सरन्यायाधीशांच्या चिंतेचे महत्त्व कमी करणारी कृतीप्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या व त्यातील पीडितांच्या व्यथेवर देशाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी अलीकडेच चिंता व्यक्त केली होती. यामुळे ही समस्या निकाली काढण्यावर गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारी वकिलांचे बेशिस्त वागणे सरन्यायाधिशांच्या चिंतेचे महत्त्व कमी करणारे आहे. राज्यात उच्च न्यायालयापेक्षा कनिष्ठ असलेल्या न्यायालयांमध्ये सध्या १० लाख ६६ हजार १२८ दिवाणी व १९ लाख २६ हजार ६१९ फौजदारी अशी एकूण २९ लाख ९२ हजार ७४७ प्रकरणे प्रलंबित आहेत. ‘नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रीड’वर ही आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आली आहे.