शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

विद्युत सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळा

By admin | Updated: January 21, 2016 02:47 IST

राज्यातील विजेचे अपघात टाळण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करा आणि विद्युत सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळा, ...

विद्युत सुरक्षा जागरूकता सप्ताहाचा समारोप : नितीन गडकरी यांचे आवाहन नागपूर : राज्यातील विजेचे अपघात टाळण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करा आणि विद्युत सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विद्युत सुरक्षेसंबंधी जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासनतर्फे विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. चिटणवीस सेंटर येथे विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. तसेच प्रधान सचिव (ऊर्जा) मुकेश खुल्लर, मुख्य विद्युत निरीक्षक सुहास बागडे प्रामुख्याने उपस्थित होते. समारोप समारंभाच्या प्रथम सत्रात व्हीएनआयटीच्या विद्युत अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. भिडे, अंबुजा सिमेंटचे सचिन देशमुख, रामदेवबाबा कॉलेज आॅफ इंजिनियरिंगचे सहयोगी प्राध्यापक धनंजय तुतकरणे, चाचणी विभाग महावितरणचे कार्यकारी अभियंता मनीष वाठ इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी विद्युत सुरक्षा स्मरणिका-२०१६ चे प्रकाशन करण्यात आले. स्वकार्यक्षेत्रात विद्युत अपघाताची संख्या निरंक असणाऱ्या वीज तंत्रज्ञ यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान विदर्भ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, महावितरण, एसएनडीएल, टाटा पॉवर, रिलायन्स, द एलिव्हेटर अ‍ॅन्ड एस्केलेटर कंपनी, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या यांना मुख्य विद्युत निरीक्षक सुहास बागडे, अधीक्षक अभियंता दिनेश खोंडे, नलावडे यांच्या हस्ते मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मुख्य अभियंता रेशमे, भादीकर, उपाध्यक्ष तूरकर व महावितरण, एसएनडीएल, एनएमसीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)