शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करा : भय्याजी जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 22:31 IST

वैश्विक संकटामुळे कोणी भयग्रस्त आहे तर कुठे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा वातावरणात प्रशासन व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करुनच सर्व लोक संकटातून मुक्त होऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.

ठळक मुद्देदेशभरातील १० हजार गावांत संघाकडून सेवाकार्य

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : यंदा रामनवमीच्या मुहूर्तावर संपूर्ण देश एका वेगळ्या स्थितीत आहे. या वैश्विक संकटामुळे कोणी भयग्रस्त आहे तर कुठे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा वातावरणात प्रशासन व वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करुनच सर्व लोक संकटातून मुक्त होऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले. रामनवमीनिमित्त त्यांनी गुरुवारी स्वयंसेवकांना उद्देशून संदेश प्रसारित केला.देशावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा संघानेदेखील मदतकार्यात सहभाग घेतला. ‘कोरोना’ संकटातदेखील १ लाखाहून अधिक स्वयंसेवक देशभरातील १० हजार गावांमध्ये पोहोचून सेवा कार्य करत आहेत. आतापर्यंत १० लाख कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात आली आहे. यात भोजन, शिधासामग्री पोहोचविणे, आरोग्य सेवेत सहकार्य करणे, जनजागृती करणे इत्यादींचा समावेश आहे, असे भय्याजी जोशी यांनी सांगितले. पुढील दोन आठवडे शासन व आरोग्य यंत्रणेच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले तर निश्चितच आपण सर्व परत एकदा सामान्य आयुष्य जगण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू. त्यासाठी सर्वांनी सर्व प्रकारचे नियम व बंधनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.भटक्यांसाठी सरसावले स्वयंसेवकमहाराष्ट्रात अनेक ठिकाणी भटक्या जमातींचे लोक विविध वस्त्यांत राहतात. ‘कोरोना’ संकटामुळे तेदेखील अडचणीत आले आहेत. संघ स्वयंसेवक त्यांच्यापर्यंत पोहोचून अन्नपाणी व आरोग्य सेवेची व्यवस्था करत आहेत. तसेच रक्तदानासाठीदेखील स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आहे. आपात्कालीन व्यवस्थेत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिकांसाठीदेखील स्वयंसेवक भोजन व अल्पोपाहाराची व्यवस्था करत आहेत.समाजाला जागृत कराभगवान रामाचे स्मरण करून या संकटातून बाहेर पडण्यासाठी शक्ती मिळेल. पुढील दोन आठवडे सर्वांनीच संकल्प घेऊन घरी राहावे. यासोबतच विविध माध्यमांतून समाजाला जागृत करण्यावरदेखील भर द्यावा. रामनवमीचा मुहूर्त समाजाचे संरक्षण, सेवा व जागृतीचा संदेश सर्वांना देत आहे. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे, असेदेखील भय्याजी जोशी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ