शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अटी पाळा व सणांचा आनंद घ्या

By admin | Updated: September 1, 2014 01:09 IST

सार्वजनिक कार्यक्रमात आयोजकांकडून दुर्लक्ष झाल्यास मोठ्या प्रमाणात अन्न विषबाधासारख्या अप्रिय घटना घडू शकतात. गणेशोत्सव आणि धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना अन्न सुरक्षा

अन्न प्रशासन विभागाची माहिती : नोंदणी बंधनकारकनागपूर : सार्वजनिक कार्यक्रमात आयोजकांकडून दुर्लक्ष झाल्यास मोठ्या प्रमाणात अन्न विषबाधासारख्या अप्रिय घटना घडू शकतात. गणेशोत्सव आणि धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींनुसार नोंदणी करणे बंधनकारक असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सणासुदीच्या दिवसांत खवा, मिठाई, दूध यापासून तयार होणारे अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जातात. जनतेच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव, पूजा संपन्न करणारी मंडळे अथवा तत्सम प्रकारची मंडळे यांच्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत.(प्रतिनिधी)प्रसाद तयार करताना जागा स्वच्छ व आयोग्यदायी असावी.प्रसादासाठी लागणारा कच्चा माल हा अन्न पदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच खरेदी करावा.प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी आणि झाकण असलेली असावी.फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना फळांची खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या, परवाना अथवा नोंदणीधारकांकडून करावी. कच्चे, सडलेल्या किंवा खराब फळांचा वापर करू नये.प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहील, याची खात्री करावी.आवश्यक तेवढाच प्रसाद तयार करावा.प्रसाद तयार करणाऱ्या स्वयंसेवकास अ‍ॅप्रन, टोपी पुरविण्यात यावे. प्रत्येक वेळी स्वयंसेवकाने हात स्वच्छ धुवावे.प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही त्वचा रोग संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी.प्रसादामध्ये खवा, मावा यासारखे नाशवंत अन्न पदार्थांचा वापर होत असल्यास अतिदक्षता- विशेष काळजी घ्यावी.दूध आणि दुधजन्य पदार्थ थंड राहतील अर्थात ४ डिग्री अथवा त्यापेक्षा कमी तापमानावर साठवणुकीस ठेवावे.खवा व माव्याची वाहतूक व साठवणूक थंड अथवा रेफ्रिजरेटेड वाहनातूनच करावी.जुना, शिळा अथवा अनेक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये साठविलेला मावा प्रसादासाठी वापरू नये.प्रसाद बनविणाऱ्या मंडळींनी प्रसादाच्या कच्च्या मालाचे बिल, प्रसाद बनविणारे कॅटरर्स अथवा स्वयंसेवक तसेच वितरण करणाऱ्या स्वयंसेवकाचे नाव, संपूर्ण पत्ता इत्यादींची माहिती ठेवावी.तपासणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी आल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून त्यांना संपूर्ण सहकार्य करावे व त्याने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.