शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांचा पालेभाज्या लागवडीवर भर !

By admin | Updated: August 11, 2014 00:54 IST

विदर्भातील शेतकरी पालेभाज्या लागवडीवर भर देत आहे.

अकोला : भाजीपाल्यांचे दर वाढतच असल्याने विदर्भातील शेतकरी पालेभाज्या लागवडीवर भर देत असून, या शेतकर्‍यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून भाजीपाला लागवडीचे तंत्रज्ञान देण्यात येत आहे. सध्या पालक लागवड करण्यात येत असल्याने त्यांना लागवडीची माहिती दिली जात आहे. पालेभाज्या आहारातील खनिजे, क्षार आणि जीवनसत्त्वाचा पुरवठा करणारा नैसर्गिक स्त्रोत आहे. पालेभाज्यात अ आणि क जीवनसत्त्वासह कॅल्शियम,लोह व इतर क्षारांचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे पालेभाज्यांची मागणी मोठी असते.थोड्याशा भांडवलावर कमी जागेत झटपट आणि सतत पैसा मिळवून देणारे हे पीक आहे. उन्हाळी हंगामात पालेभाज्यांची मोठी मागणी असते आणि बाजारभाव चांगले मिळतात म्हणून अलीकडे शेतकर्‍यांनी पालेभाज्या लागवडीवर भर दिला आहे.पालक या भाजीत अ,क प्रथिने, लोह, चुना व इतर खनिजे भरपूर आहेत. त्यामुळे आहाराच्या दृष्टीने पालक महत्त्वाची भाजी आहे. पालकाची आमटी,सूप, भजी तसेच विविध भाज्या तयार करता येतात. राज्यात सर्वत्र पालकाची लावगड केली जाते. खरीप हंगामात जून,जुलै तर रब्बी हंगामात सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात लागवड करतात.या भाजीचा सतत पुरवठा करायचा असल्यास १0 ते १५ दिवसांच्या अंतराने पालकाचे बी पेरावे लागते.मेथी या पालेभाजीचे कसुरी व नेहमीची मेथी असे दोन प्रकार आहेत. आपल्याकडे या भाजीची लागवड खरीप व रब्बी हंगामात केली जाते. या भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी टप्प्या-टप्प्याने पेरणी केली जाते.कोथिंबीर प्रामुख्याने खरीप हंगामात पेरली जाते. कोथिंबीरची मागणी वर्षभर असते. फळझाडे किंवा इतर भाजीपाला पिकात कोथिंबीर आंतरपीक म्हणून घेतली जाते. त्यामुळे तिचे प्रखर उन्हापासून संरक्षण होते.आंबटचुका पालेभाजी गोल आकाराची असून, किंचित चवीला आंबट आहे. विविध औषधी गुणधर्म अर्थात वात दोष व पचनक्रिया सुधारण्यास मदत करणारी आंबटचुका भाजी हिवाळी हंगामात घेतली जाते.