शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
4
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
5
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
6
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
7
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
8
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
9
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
10
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
11
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
12
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
13
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
14
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
15
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
16
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
17
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
18
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
19
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...

विमानाने जाणे, रेल्वेने परतणे

By admin | Updated: October 21, 2016 02:49 IST

अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी

नागपूर : अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोकेनच्या तस्करीत सहभागी असणाऱ्यांना अटक करण्यासाठी बुधवारी रात्री ठिकठिकाणी सापळे लावले. त्यात सचिन अडकला. बबलूलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतर बबलू शेखचे अपहरण झाल्याची वार्ता जाणीवपूर्वक पसरवण्यात आली. काहींनी कोडवर्ड वापरून बबलूला कोकेन प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे संबंधितांना मेसेज दिले. त्यामुळे अनेकांनी नागपुरातून पळ काढला. कोकेनची खेप घेण्यासाठी नागपुरात आलेल्या गोंदियाच्या तस्कराने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला. लोकमतला संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्रीफर-ब्रजेश हे मुंबईतून कोकेन तस्करी करतात. त्यांच्याकडे ठिकठिकाणच्या कोकेन तस्करांना आणि शौकिनांना माल पुरविण्यासाठी वेगवेगळे कुरियर आहेत. त्यातील एक कुरियर म्हणून सचिन होय. तो नागपुरातील मागणीनसुार, महिन्यातून दोन वेळा मुंबईला जातो. विमानाने जाणे आणि कोकेन घेऊन रेल्वेने परत येणे. त्यानंतर ज्यांनी आॅर्डर नोंदवली. त्यांच्यापर्यंत कोकेन पोहचविणे, अशी सचिनची भूमिका आहे. त्यासाठी प्रत्येक ग्राहकाकडून त्याला ३ ते ४ हजार रुपये आणि एका खेपेसाठी स्रीफर-ब्रजेशची जोडगोळी १० हजार रुपये देते. प्रवासाचा खर्च ही जोडगोळीच करते. एका खेपेत आठ ते दहा कोकेन विक्रेते आणि शौकिनांचा माल असतो. अर्थात सचिनला एका खेपेसाठी ३० ते ४० हजार रुपये मिळतात. बुकी, बार डान्सर आणि अकाऊंटसचिनसोबत कुरियर म्हणून एका बार डान्सरचे नाव पुढे आले आहे. एमआयडीसीत तिच्या नावाची जोरदार चर्चा आहे. कोकेन पिणाऱ्यांमध्ये बुकी आणि जुगार खेळणाऱ्यांचा जास्तीत जास्त समावेश आहे. कोकेनमुळे माणसाला लवकर झोप येत नाही. त्याच्या ‘शारीरिक शक्ती‘तही कोकेनमुळे वेगळी भर पडते. त्यामुळे रात्रभर जागरण करण्याची सवय जडलेले बुकी, जुगारी अन् डान्सबारमध्ये जाणारे कोकनचा शौक करतात. त्यांचे बार डान्सरच्या माध्यमातून स्रीफर-ब्रजेशशी संबंध आहेत. ते तिच्याच माध्यमातून कोडवर्डवर कोकेनची आॅर्डर नोंदवतात. त्यानंतर संबंधित अकाऊंटमध्ये रक्कम जमा केली जाते. ही रक्कम जमा झाल्यानंतर संबंधितांना कोकेनची डिलिव्हरी मिळते. गेल्या आठड्यात काही बुकी एमआयडीसीच्या एका बारमध्ये कोकेन आणि पांढरे पावडर पीत बसले होते. मात्र, पोलीस येणार ही माहिती कळताच तेथून बुकींनी पळ काढला होता.