शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी’ फेस्ट ठरला ‘फ्लॉप शो’

By admin | Updated: June 15, 2017 02:01 IST

केंद्र शासनाच्या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा मांडण्यासाठी देशातील २९९ शहरांसोबत नागपुरातदेखील ‘मोदी’ फेस्टचे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र शासनाच्या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा मांडण्यासाठी देशातील २९९ शहरांसोबत नागपुरातदेखील ‘मोदी’ फेस्टचे (मेकिंग अ‍ॅन्ड डेव्हलप्ड इंडिया) आयोजन करण्यात आले होते. मात्र आयोजनाची जबाबदारी असलेल्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे उत्सवाला फटका बसला. भाजपाच्यादेखील अनेक कार्यकर्त्यांना अशाप्रकारचा उत्सव महालातील चिटणीस पार्कमध्ये असल्याचे माहीत नव्हते. भाजपाच्या मोठ्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांनी या उत्सवाकडे पाठच फिरविली व स्थानिक आयोजकांमुळे केंद्र शासनाचा उपक्रम अक्षरश: ‘फ्लॉप शो’ ठरल्याचे दिसून आले. गेल्या तीन वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजना आणि पुढाकारांविषयी जनतेसोबत संवाद साधण्याच्या उद्देशाने चिटणीस पार्क येथे १० ते १२ जून या कालावधीत याचे आयोजन करण्यात आले होते. आयोजनाची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा शिवानी दाणी यांच्याकडे देण्यात आली होती. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे मोठे नेते आहेत. गडकरी व फडणवीस नागपुरात नसल्याने या कार्यक्रमाला जाऊ शकले नाही. मात्र शहरातील एकही आमदार तसेच राज्यसभा खासदारानेदेखील या उत्सवाला भेट दिली नाही. इतकेच काय पण नगरसेवक व भाजपाचे कार्यकर्तेदेखील भटकले नाहीत. मुळात या उत्सवाची बहुतांश जणांना माहितीच नव्हती. कार्यक्रमाच्या प्रचार- प्रसारासाठी योग्य प्रसारमाध्यमांची निवडच करण्यात आली नव्हती. प्रचारच नसल्यामुळे नागरिकांना माहिती मिळालीच नाही. परिणामी आयोजनस्थळी केवळ ‘स्टॉल्स’ आणि रिकाम्या खुर्च्या असेच चित्र होते. यामुळे कार्यक्रमाच्या आयोजनाच्या केंद्र शासनाच्या उद्दिष्टालाच हरताळ फासल्या गेला. कार्यकर्त्यांची नाराजी भोवली शिवानी दाणी यांच्याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असतो. त्यांच्या कार्यप्रणालीवरून अनेक जण नाखूश आहेत. ‘मोदी’ फेस्टची जबाबदारी त्यांच्याकडे आहे, असे कळल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. उद्घाटनाचा कार्यक्रम सोडला तर बाकी तीनही दिवस रिकाम्या खुर्च्याच दिसून आल्या चौकटीपुरताच कार्यक्रम मर्यादित ‘मोदी’ फेस्टच्या आयोजनाची जबाबदारी शिवानी दाणी यांच्याकडे होती. एरवी लहानसहान कार्यक्रमांचा त्यांच्याकडून प्रसारमाध्यमे आणि ‘सोशल मीडिया’ मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार करण्यात येतो. मात्र केंद्र शासनाशी संबंधित कार्यक्रम असूनदेखील ‘मोदी’ फेस्टला आयोजकांनी एका चौकटीपुरतेच मर्यादित ठेवले. संघाचा बालेकिल्ला असलेल्या महालात आयोजन असूनदेखील तेथीलच बऱ्याच कार्यकर्त्यांना याची माहिती नव्हती. यावरूनच किती ढिसाळ नियोजन होते, हे स्पष्ट होत आहे.