शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ग्रेज्युएशन डिग्रीशी संबंधित माहितीचा खुलासा होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
4
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
5
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
6
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
7
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
8
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
9
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
10
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
11
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
12
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
13
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
14
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
15
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
16
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
17
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
18
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
19
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
20
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा

‘एनएचएआय’ बांधणार सदरचा उड्डाण पूल

By admin | Updated: September 14, 2014 01:09 IST

सदरमध्ये रेसिडेन्सी रोडचा प्रस्तावित उड्डाण पूल तयार करण्याचे काम नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी (एनएचएआय) करणार आहे. एका महिन्यापूर्वी अ‍ॅथॉरिटीला भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून या कामाबाबतचे पत्र

तिसऱ्यांदा ‘डीपीआर’ तयार : भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून मिळाले पत्रवसीम कुरेशी - नागपूरसदरमध्ये रेसिडेन्सी रोडचा प्रस्तावित उड्डाण पूल तयार करण्याचे काम नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी (एनएचएआय) करणार आहे. एका महिन्यापूर्वी अ‍ॅथॉरिटीला भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडून या कामाबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. अ‍ॅथॉरिटी ३ किलोमिटर लांबीच्या या प्रस्तावित उड्डाण पुलासाठी ‘डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट’ (डीपीआर) तयार करण्याच्या कामाला लागली आहे. या कामासाठी १४० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून या कामाची नागरिक वाट पाहत होते. सदरचा हा रस्ते हायवे क्रमांक ६९ चा भाग आहे. लिबर्टी टॉकीजपासून छावणीपर्यंत वाहनांची गर्दी आणि दुकाने असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ‘एनएचएआय’ने रिझर्व्ह बँक चौकातून हा उड्डाणपुल तयार करण्याची तयारी केली आहे. ही जागा शहरातील हायवे क्रमांक ६९ चा सुरुवातीची जागा आहे. येथून पागलखाना चौकापर्यंत उड्डाण पूल तयार करण्यात येणार आहे. पूर्वीच्या प्रस्तावित योजनेत लिबर्टी टॉकीजपासून राजभवनापर्यंत हा पूल तयार करण्यात येणार होता.आधी सुद्धा तयार झाला होता ‘डीपीआर’महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) २००७-०८ मध्ये याबाबत ‘डीपीआर’ तयार केला. त्यानंतर प्रस्तावात संशोधन करून पुन्हा ‘डीपीआर’ तयार करण्यात आला. एका वषार्नंतर महानगरपालिकेने ‘डीपीआर’ तयार केला. महापालिकेने जेएनएनयुआरएमच्या अंतर्गत निधी मिळविण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतू तो मंजूर झाला नाही. त्यानंतर अंदाजे खर्चात वाढ करून संशोधित प्रस्ताव शहर विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. ७ वर्षापूर्वी लिबर्टी टॉकीजपासून राजभवन चौकापर्यंत प्रस्तावित उड्डाण पुलाचा खर्च ५७ कोटी रुपये येणार होता. परंतु सध्या हा खर्च तिप्पट झाला आहे. ‘एमएसआरडीसी’ने पूर्वी प्रस्तावित केल्यानुसार या कामाला दोन वर्षाचा कालावधी लागणार होता. ‘फोर लेन’चा प्रयत्नशहरात उड्डाण पूल तयार होण्याची ही दुसरी वेळ आहे. सदर येथील मार्ग अतिशय अरुंद आहे. त्यामुळे फोर लेनचा पूल तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या भागात जमीन अधिग्रहणाची गरज आहे. महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने कामात अडथळा येणार नाही. स्थानिक नागरिकांसोबतही पुलाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. ‘रेसिडेन्सी फ्लाय ओव्हर’ तयार करण्याबाबत ‘एनएचएआय’ला भूपृष्ठ विकास मंत्रालयाकडून पत्र मिळाले असून त्याचा ‘डीपीआर’ तयार करण्यात येत आहे.’-एम. चंद्रशेखर, प्रकल्प व्यवस्थापक, एनएचएआय