शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापन परिषदेवर शिक्षण मंचचा झेंडा; विविध समित्यांवर सदस्यांची बिनविरोध निवड

By जितेंद्र ढवळे | Updated: June 7, 2023 17:26 IST

विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात बुधवारी अधिसभेतून (सिनेट) व्यवस्थापन परिषदेसह विविध समित्यांवरील रिक्त पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.

नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसह विविध समित्यांच्या निवडणुकीत शिक्षण मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद समर्थित उमेदवारांनी बाजी मारली आहे.

विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात बुधवारी अधिसभेतून (सिनेट) व्यवस्थापन परिषदेसह विविध समित्यांवरील रिक्त पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. तीत अधिसभेच्या सदस्यांमधून प्राचार्य, अध्यापक व विद्यापीठ अध्यापक, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, नोंदणीकृत पदवीधर या गटातून व्यवस्थापन परिषदेवर सदस्यांची निवड करण्यात आली. यात प्राचार्य गटात खुल्या प्रवर्गातून डॉ. निळकंठ लंजे, इतर मागासवर्ग प्रवर्गातून डॉ. देवेंद्र भोंगाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यापक व विद्यापीठ अध्यापक गटात खुल्या प्रवर्गातून डॉ. योगेश भुते तर इतर मागासवर्ग प्रवर्गातून डॉ. पांडुरंग डांगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

व्यवस्थापनाचे प्रतिनिधी गटातून खुल्या प्रवर्गात अजय अग्रवाल यांची निवड करण्यात आली. नोंदणीकृत पदवीधर गटात खुल्या प्रवर्गातून अजय चव्हाण तर भटक्या जमाती प्रवर्गातून वामन तुर्के यांची व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या अधिसभा बैठकीला, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, अधिसभा सदस्य विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

विविध समित्यांवर नामनिर्देशन

अधिसभेचे सदस्य असलेल्या व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींमधून विद्या परिषदेवर एक व्यवस्थापन प्रतिनिधी नामनिर्देशित करण्यात येतो. या गटामध्ये एकच अर्ज प्राप्त झाल्याने डॉ. उमेश पांडुरंग तुळसकर यांचे विद्यापरिषदेवर बिनविरोध नामनिर्देशन करण्यात आले. यासोबतच प्राचार्यांमधून एक प्राचार्य स्थायी समितीवर नामनिर्देशित करण्यात येतो. या गटात डॉ. सचिन उंटवाले यांचे स्थायी समितीवर बिनविरोध नामनिर्देशन करण्यात आले. अधिसभेचा सदस्य असलेल्या अध्यापकांमधून एक अध्यापक स्थायी समितीवर नामनिर्देशित करण्यात येतो.

या गटात डॉ. संदीप गायकवाड यांचे स्थायी समितीवर बिनविरोध नामनिर्देशन करण्यात आले. नोंदणीकृत पदवीधरांमधून एक पदवीधर स्थायी समितीवर नामनिर्देशित करण्यात आला. या गटात मनीष वंजारी यांचे बिनविरोध नामनिर्देशन करण्यात आले. तक्रार निवारण समितीवर अध्यापक गटामधून डॉ. पांडुरंग सदाशिव डांगे तर शिक्षकेतर कर्मचारी गटामधून मनोज मलकापुरे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

टॅग्स :ElectionनिवडणूकRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र