शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

कामठीत ठिकठिकाणी ध्वजाराेहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST

कामठी : प्रजासत्ताक दिनानिमित्त कामठी शहर व तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजाराेहण करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या ...

कामठी : प्रजासत्ताक दिनानिमित्त कामठी शहर व तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजाराेहण करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी सहायक पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके यांच्या नेतृत्वात पाेलीस कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कार्यक्रमाला नगरध्यक्ष शहाजहां शफाअत अन्सारी, न. प. उपाध्यक्ष अफाज अहमद, माजी आमदार देवराव रडके, जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे, पंचायत समिती सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मल्लेवार, माजी नगराध्यक्ष रतनलाल बरबडे, स्वातंत्र्य सेनानी प्रा. रतनलाल पहाडी, नायब तहसीलदार रणजित दुसावार, सुनील तरोडकर, आर. टी. उके, एस. एन. कवटी, वरिष्ठ लिपिक वर्षा भुजाडे, बेबीनंदा झोटिंग, अमोल पोळ, शेख शरीफ, वसुंधरा मानवटकर, मंडळ अधिकारी महेश कुलदीपवार, विवेक अनवाणे, एस. एन. चंद्रिकापुरे, राहुल भुजाडे उपस्थित होते. नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष शहाजहां शफाहत अन्सारी यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी उपाध्यक्ष अफाज अहमद, मुख्याधिकारी संदीप बोरकर, नगरसेविका वैशाली मानवटकर, संजय कनोजिया, मंदा चिमणकर, सुषमा सिलाम, मुस्ताक ठेकेदार, रमा गजभिये, मतीन खान, रघुवीर मेश्राम, सुरय्या अन्सारी, राजू पोलकमवार, चंपा वाधवानी, मीनाक्षी बुरबुरे, सईद उबेद, सोफिया कौसर, पिंकी वैद्य, ममता कांबळे, मोहम्मद अक्रम, सरोज रंगारी, लालसिंग यादव, संध्या रायबोले, स्नेहलता गजभिये, प्रतीक पडोळे, सविता शर्मा, रमेश दुबे, सुभाष मगतानी उपस्थित होते. पंचायत समिती कार्यालयात सभापती उमेश रडके यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपसभापती आशिष मल्लेवार, गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, पंचायत समिती सदस्य पूनम माळवदे, शालू हटवार, वनिता जिचकार, दिशा चनकापुरे, दिलीप वंजारी, सुमेध रंगारी उपस्थित होते. जुनी कामठी पोलीस ठाण्यात ठाणेदार विजय मालचे तर नवीन कामठी ठाण्यात ठाणेदार सतीश मुंढे यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी सहायक पाेलीस निरीक्षक युनूस शेख व सुरेश कन्नाके यांच्या नेतृत्वात पाेलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. उपजिल्हा रुग्णालयात अधीक्षक डाॅ. नयना दुपारे यांनी ध्वजाराेहण केले. कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात सभापती हुकूमचंद आमधरे यांनी ध्वजाराेहण केले. यावेळी उपसभापती प्रमाेद महल्ले, सचिव एस. नागपुरे, पं. स. सभापती उमेश रडके, नगराध्यक्ष शहाजहां शफाअत उपस्थित हाेते. नगर काँग्रेस कमिटी कार्यालयात कृष्णा यादव यांनी, भाजप कार्यालयात अध्यक्ष संजय कनाेजिया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात साेहेब असद, शिवसेना कार्यालयात जिल्हा उपप्रमुख राधेश्याम हटवार, एमआयएम कार्यालयात जिल्हा अध्यक्ष शकीर रहेमान, बसपा कार्यालयात नगरसेविका रमा गजभिये यांनी ध्वजाराेहण केले. तसेच येरखेडा ग्रामपंचायत येथे सरपंच मंगला कारेमाेरे, रनाळा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुवर्णा साबळे, वारेगाव ग्रामपंचायतमध्ये सरपंच कमलाकर बांगरे, खैरी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मोरेश्वर कापसे, लिहीगाव ग्रामपंचायत येथे सरपंच गणेश झोड, नेरी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अरुण आकरे, आजनी ग्रामपंचायत येथे सरपंच सुनील मेश्राम यांनी ध्वजाराेहण केले.