शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटा बाळगणाऱ्या महिलेला पाच वर्षे कारावास

By admin | Updated: October 12, 2015 02:45 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महिला आरोपीला बनावट चलनी नोटा बाळगण्याच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवून पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

हायकोर्ट : सत्र न्यायालयाच्या शिक्षेत केला बदलनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महिला आरोपीला बनावट चलनी नोटा बाळगण्याच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवून पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.फरिदा बेगम अब्दुल आहत (३०) असे आरोपीचे नाव असून ती पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. ४ आॅगस्ट २०११ रोजी जरीपटका पोलिसांना एक पुरुष व एका महिलेकडे बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून फरीदा बेगम व मोहम्मद फारुक अब्दुल सत्तारला अटक केली. फारुकजवळ हजार रुपयाच्या ३३ तर, फरिदाजवळ १६ नोटा आढळून आल्या. रिझर्व्ह बँकेने आरोपीजवळील नोटा बनावट असल्याचा अहवाल दिला. तपासानंतर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. १४ आॅगस्ट २०१२ रोजी सत्र न्यायालयाने फरिदा बेगम व अब्दुल सत्तारला भादंविच्या कलम ४८९-बी (बनावट नोटा खऱ्या भासवून उपयोगात आणणे) अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावास तर, कलम ४८९-सी (बनावट नोटा जवळ बाळगणे) अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. तिसरा आरोपी मुस्तफा कमाल मोहम्मद शब्बीरला निर्दोष सोडले होते. उच्च न्यायालयात केवळ फरिदा बेगमने शिक्षेला आव्हान दिले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता फरिदाचे अपील अंशत: मंजूर करून सत्र न्यायालयाच्या आदेशात बदल केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, फरिदाला भादंविच्या कलम ४८९-बी मध्ये निर्दोष ठरवून याअंतर्गतची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. कलम ४८९-सी अंतर्गतचा दोष कायम ठेवण्यात आला असून शिक्षा सात वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत कमी करण्यात आली आहे. जरीपटका पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता.(प्रतिनिधी)