शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

रस्त्यांवरील पाच ट्रक माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:32 IST

तुकडोजी चौक ते मानेवाडा रिंगरोडवर फळविक्रेत्यांपासून ते भाजी विक्रेते, चहा टपºया, दुकानदार, हॉटेल्स,औषध विक्रेते, फर्निचर व्यावसायिक व किराणा व्यापाºयांनी अतिक्रमण केल्याने या मार्गाने वाहन चालविणे कठीण झाले होते.

ठळक मुद्देतुकडोजी चौक ते मानेवाडा रस्ता मोकळा : अजनी वाहतूक पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुकडोजी चौक ते मानेवाडा रिंगरोडवर फळविक्रेत्यांपासून ते भाजी विक्रेते, चहा टपºया, दुकानदार, हॉटेल्स,औषध विक्रेते, फर्निचर व्यावसायिक व किराणा व्यापाºयांनी अतिक्रमण केल्याने या मार्गाने वाहन चालविणे कठीण झाले होते. ‘लोकमत’ने या विषयी वृत्त प्रसिद्ध करताच बुधवारी वाहतूक चेंबर चार अजनी पोलिसांनी व महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने विशेष कारवाई करीत तब्बल पाच ट्रक माल जप्त केला. सोबतच २८ हजार रुपयांची वसुलीही केली. या कारवाईने अतिक्रमण करणाºयांचे धाबे दणाणले आहे.राष्टÑसंत तुकडोजी महाराज चौक ालगत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल आहे. रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची गर्दी या भागात असते. तुकडोजी चौकातून मानेवाडा रिंगरोड व हुडकेश्वर रिंगरोडला जाणाºया मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र फूटपाथच नव्हे तर त्याहीपुढेही अतिक्रमण झाले होते. या शिवाय, बीअरबार, बँक, किराणा दुकान व हॉटेल्समध्ये येणारे ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने उभी करीत असल्याने आणि विविध खाद्य पदार्थांचे व फळांचे हातठेले फुटपाथसह रस्त्यावर उभे केले जात असल्याने वाहतुकीची नेहमीच कोंडी व्हायची. ‘लोकमत’ने २९ आॅक्टोबर रोजी ‘मानेवाडा रोडचा श्वास गुदमरतोय’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल वाहतूक चेंबर चार अजनीचे पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांनी घेतली. त्यांनी लागलीच मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या मदतीने बुधवारी धडक कारवाई केली. दुपारी १२ वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालली. यात पाच ट्रक अतिक्रमण साहित्य जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, २८ हजार रुपयांची वसुलीही करण्यात आली. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्वरुपात झालेल्या कारवाईमुळे कधी नव्हे तो हा मार्ग अतिक्रमण मुक्त झाला. नागरिकांनी ‘लोकमत’सोबतच अजनी वाहतूक पोलीस विभागाचे कौतुक केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के व मनपाचे अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व पोलीस सहनिरीक्षक विलास सानप यांनी केली.कारवाई सुरूच राहणारतुकडोजी चौक ते मानेवाडा रोड या मार्गावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. परंतु पुन्हा या मार्गावर अतिक्रमण झाल्यास अतिक्रमणधारकावर कठोर कारवाई करण्यात येईल. इतरही मार्गावर निरंतर कारवाई सुरू राहील.- श्याम सोनटक्केपोलीस निरीक्षक,वाहतूक चेंबर चार अजनी