शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वे पाच हजार झाडे लावणार

By admin | Updated: June 24, 2016 03:11 IST

नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएमआरसीएल) मेट्रो रेल्वे प्रकल्प इको फ्रेंड्ली बनविण्याचा विडा उचलला असून शहरात हिरवळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

एक कोटीचा निधी राखीव : मिहान डेपोमध्ये पार्क उभारणारनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएमआरसीएल) मेट्रो रेल्वे प्रकल्प इको फ्रेंड्ली बनविण्याचा विडा उचलला असून शहरात हिरवळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत अंबाझरी परिसर आणि हिंगणा रोडपर्यंत जवळपास १५ हेक्टर जमिनीवर पाच हजार झाडे लावण्यात येणार आहे. व्यावसायिक एजन्सीची मदत घेणारआॅटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मार्गावर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेसाठी आतापर्यंत ४५२ झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन आणि शहरातील हिरवळ टिकून ठेवण्याचे काम मेट्रो रेल्वेपुढे आहे. वनीकरणाच्या नियमानुसार एजन्सी १८५० झाले लावणार होती. पण त्यापेक्षा अडीचपट अर्थात पाच हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. मेट्रो रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वनीकरणाचा उपयोग सामान्य नागरिकांना होईल, अशा रितीने मेट्रो रेल्वे एजन्सीकडून नियोजन करण्यात येणार आहे. झाडांच्या सभोवताल वॉकिंग ट्रॅक बनविण्यात येणार आहे. याशिवाय सर्वसामान्यांसाठी बेन्चेस आणि छत लावण्यात येणार आहे. तसेच मेट्रो रेल्वे एजन्सी आपल्या मिहान डेपोमध्ये पार्कचा विकास करणार आहे. याशिवाय तलाव खोदून डेपोच्या सभोवताल छोटा नाला तयार करण्यात येईल. त्याठिकाणी वृक्षारोपण करून वॉटर बॉडी तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी सृष्टी पर्यावरण मंडळ आणि नेचर लव्हर्स फेलोशिप सोसायटीची मदत घेण्यात येणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)