शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सारीचे आणखी पाच नवे रुग्ण मेडिकलमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:16 IST

‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चे रुग्ण वाढत असताना ते कोविड पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या आठवड्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ११ मे रोजी यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मेडिकलमध्ये आज आणखी पाच नवे रुग्ण दाखल झाले.

ठळक मुद्दे१७ रुग्णांवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’चे रुग्ण वाढत असताना ते कोविड पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या आठवड्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ११ मे रोजी यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मेडिकलमध्ये आज आणखी पाच नवे रुग्ण दाखल झाले. सध्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.मेडिकलमध्ये ७ मे रोजी पांढराबोडी, शताब्दीनगर व मोमिनपुऱ्यातील तीन सारीचे रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर ९ मे रोजी जवारहरनगर येथील ५१ वर्षीय पुरुष व पार्वतीनगरमधील २४ वर्षीय पुरुष रुग्णाची भर पडली. यातील पांढराबोडी येथील २९ वर्षीय सारी व कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाला इतरही आजार असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शंका उपस्थित केली जात आहे. परंतु सारीचे रुग्ण पॉझिटिव्ह येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. आज मेडिकलमध्ये सारीचे पाच रुग्ण भरती झाले. यात मोमिनपुरा येथील ३९ वर्षीय महिला, दिघोरी येथील ५० वर्षीय पुरुष, पार्वतीनगर येथील ३२ वर्षीय पुरुष, जुनी शुक्रवारी हनुमानगर येथील ५९ वर्षीय पुरुष व चंदननगर येथील ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये सारीच्या वॉर्डात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सारीचे रुग्ण नव्या वसाहतींमधून येत असल्याने त्या-त्या वसाहतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय