शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

राज्यात पाच लाखांवर ‘आरसी’ प्रलंबित

By admin | Updated: July 25, 2016 02:36 IST

राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अजब कारभार सुरू आहे. अन्य सेवांसाठी आॅनलाईन ....

विदर्भात ८८ हजार : परिवहन विभागाचा भोंगळ कारभार सुमेध वाघमारे नागपूर राज्यभरातील ५० प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) अजब कारभार सुरू आहे. अन्य सेवांसाठी आॅनलाईन आणि स्मार्ट पद्धतीचा अवलंब केला जात असताना वाहनांचे नोंदणीपुस्तक (आरसी बुक) कुठे सहा महिन्यांपासून तर कुठे गेल्या महिन्यापासून देणेच बंद झाले आहे. परिवहन विभागाने आरसीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदाचा पुरवठा थांबविल्याने राज्यभरात ५ लाख १३ हजार ५६१ आरसी प्रलंबित आहेत. यात एकट्या विदर्भात ८८ हजार, पुण्यात ६३ हजार, नाशिकमध्ये ५५ हजार तर ठाण्यात ५० हजार आरसी बुक कार्यालयातच पडून आहेत. परिवहन विभागाने कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील ‘आरसी बूक’ला २००६मध्ये ‘स्मार्ट कार्ड’चे स्वरूप दिले. या ‘कार्ड’च्या पुरवठ्यासाठी ‘शाँग’ या खासगी कंपनीशी करार केला. जून २०१४ मध्ये कंपनीचे कंत्राट संपले. विभागाने कंपनीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. परंतु या दरम्यान नव्या कंपनीला कंत्राट किंवा या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नाही. परिणामी, डिसेंबर २०१४ पासून नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांना जुन्या स्वरुपातील कागदी पुस्तिकेच्या स्वरूपातील आरसी बुक देणे सुरू झाले. आरटीओकडे आधीच कमी मनुष्यबळ यात या नव्या कामाची भर पडल्याने आणि वेळोवेळी आरसी कागदाचा (प्रि प्रिंटर स्टेशनरी) तुटवडा पडत राहिल्याने गेल्या वर्षी एक लाखावर प्रलंबित आरसीची संख्या गेली होती. ‘लोकमत’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ उडाली होती. गेल्या अधिवेशनात तारांकित प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. परंतु त्यानंतरही परिवहन विभाागकडून हालचाली झालेल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाकडून जानेवारी २०१६ पासून या कागदाचा पुरवठाच झालाच नाही. परिणामी, ही संख्या राज्यात ५लाखांवर पोहचली आहे. परिवहन विभागाच्या या भोंगळ कारभाराचा फटका वाहनधारकांना बसत आहे. वाहनांची आरसी मिळावी म्हणून रोज शेकडो वाहनधारक कार्यालयात खेटे घालत आहेत. सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. चंद्रपूर आरटीओमध्ये ३१,७०० आरसी प्रलंबित विदर्भातील इतर आरटीओच्या तुलनेत चंद्रपूर आरटीओमध्ये सर्वाधिक, ३१ हजार ७०० आरसी प्रलंबित आहेत. गोंदिया आरटीओमध्ये १३ हजार, बुलडाणा आरटीओमध्ये १० हजार ५००, नागपूर शहर आरटीओमध्ये ६५, नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये ७ हजार ७५७ तर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ५५०० असे ८८ हजार २५८ आरसी कार्यालयात प्रलंबित आहेत.