शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत मेडिकलच्या अ‍ॅडमिशनची थाप मारून पाच लाख उकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 14:37 IST

Nagpur News मेडिकलमध्ये अ‍ॅडमिशन करून देतो, अशी थाप मारून दोन भामट्यांनी एका व्यक्तीकडून पाच लाख रुपये उकळले. एवढेच नव्हे तर पीडित व्यक्तीच्या बनावट सह्या असलेला स्टॅम्प तयार करून त्या आधारे रक्कम परत केल्याचा आरोपींनी कांगावा केला.

ठळक मुद्देस्टॅम्पवर खोट्या सह्या करून फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - मेडिकलमध्ये अ‍ॅडमिशन करून देतो, अशी थाप मारून दोन भामट्यांनी एका व्यक्तीकडून पाच लाख रुपये उकळले. एवढेच नव्हे तर पीडित व्यक्तीच्या बनावट सह्या असलेला स्टॅम्प तयार करून त्या आधारे रक्कम परत केल्याचा आरोपींनी कांगावा केला. आरोपीची थापेबाजी लक्षात आल्याने पीडिताने लकडगंज पोलिसांकडे शुक्रवारी तक्रार नोंदवली. रवी लखन परियाल (वय ३५, रा.भामटीपुरा, वर्धा) आणि अमोल नारायण मस्के (वय ४०, रा. अर्पण अपार्टमेंट, नालवाडी वर्धा) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.प्रताप जयकिशन कंजवानी (वय ४५) हे समाधान आश्रम मार्गावर राहतात. त्यांच्या मेव्हण्याची आरोपींसोबत ओळख आहे. आरोपी परियाल आणि मस्के हे दोघे मेडिकलमध्ये एमबीबीएसची अ‍ॅडमिशन करून देतो, अशी बतावणी करत फिरतात. कंजवानी यांना त्यांच्या मुलीची एमबीबीएसला अ‍ॅडमिशन करायची असल्याने त्यांच्या मेव्हण्याने आरोपी परियालचा मोबाईल नंबर ६ जुलै २०१९ ला कंजवानी यांना दिला होता. त्यावेळी कंजवानी यांनी परियालकडे मुलीच्या अ‍ॅडमिशनसंबंधाने चौकशी केली. त्यानंतर त्याला छापरूनगर गार्डनजवळ बोलवून त्याच्यासोबत चर्चा केली. यावेळी आरोपीने आपले वरपर्यंत धागेदोरे असल्याची थाप मारून शंभर टक्के अ‍ॅडमिशन होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यासाठी त्याने १५ लाख रुपयांची मागणी केली होती. कंजवानी यांनी दोन दिवसानंतर पुन्हा परियालसोबत संपर्क साधला असता त्याने आपल्या वर्धा येथील महाराष्ट्र बँकेच्या खात्यात ५ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार कंजवानीयांनी ही रक्कम जमा केली.

त्यानंतर आरोपी परियाल आणि त्याचा साथीदार मस्के या दोघांनी वेगवेगळे कारण सांगून कंजवानींना बरेच दिवस टाळले. मात्र कंजवानी यांच्या मुलीची एमबीबीएसला अ‍ॅडमिशन करून दिली नाही. दिलेले पाच लाख रुपये परत मागितले असता ते पण परत केले नाही. एवढेच नव्हे तर आरोपींनी एका स्टॅम्प पेपरवर रक्कम परत केल्याचा लेख लिहून त्यावर कंजवानी यांच्या बनावट सह्या केल्या. तो स्टॅम्पपेपर दाखवून आरोपी कंजवानी यांची बोळवण करू लागले. ते रक्कम परत करणार नाही, त्यांनी फसवणूक केल्याचे ध्यानात आल्याने कंजवानी यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशीकरून शुक्रवारी या प्रकरणात फसवणूकीच्या विविध कलमांची नोंद करून गुन्हा दाखल केला.पोलीस पथक वर्ध्याला जाणारदोन्ही आरोपी वर्ध्याला राहतात. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथक वर्ध्याला जाणार असल्याची माहिती लकडगंजचे ठाणेदार पराग पोटे यांनी दिली. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजी