आॅनलाईन लोकमतनागपूर : दरोड्याच्या तयारीतील झारखंडच्या एका सशस्त्र टोळीला पकडल्यानंतर सक्करदरा पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाखांचे ६७ स्मार्ट फोन जप्त केले. सात जणांच्या या टोळीतील तिघे अल्पवयीन आहेत, हे विशेष!दीपक चभरू नोनिया (वय ३१, रा. महादेव बरण साहेबगंज, झारखंड), मोहम्मद इर्शाद अन्सारी (वय १९, रा. पुराभट्टा, तालझरी, साहेबगंज) रामू दिलीप महतू (वय २९), सूरजकुमार बाबुलाल मंडला (वय २५, दोघेही रा. महाराजपूर, नयाटोला) या टोळीतील आरोपींची नावे आहेत.सक्करदऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज गजानन ओरके हे शुक्रवारी १ डिसेंबरच्या रात्री ८ च्या सुमारास कर्तव्यावर असताना त्यांना बहादुरा (उमरेड रोड) सुरभी बारच्या मागे काही सशस्त्र गुन्हेगार दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तेथे धाव घेऊन उपरोक्त आरोपींना जेरबंद केले. त्यावेळी आरोपींकडून विविध कंपन्यांचे १० मोबाईल, तलवार, चाकू, मिरची पावडर, दोरी तसेच २४६० रुपये असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर ते राहत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी झडती घेतली असता पोलिसांना विविध कंपन्यांचे आणखी ५७ स्मार्ट फोन आढळले. अल्पवयीन आरोपींच्या माध्यमातून ही टोळी शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरायची, असे चौकशीत स्पष्ट झाले.नागपुरात चोरी, झारखंडमध्ये विक्रीमोबाईल चोरांची टोळी खूपच सराईत आहे. यापूर्वीही या टोळीतील सदस्य नागपुरात येऊन गेले आहेत. ते येथे भाड्याची खोली घेऊन राहतात. १०० ते १५० मोबाईल चोरल्यानंतर ते झारखंडमध्ये नेऊन विकतात. अनेकदा पोलीस मोबाईल चोरीची तक्रार नोंदवून न घेता मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार नोंदवतात. त्यामुळे तपासाचे बंधन राहत नाही. परिणामी चोरलेल्या मोबाईलची विक्री सहजपणे होते आणि पोलिसांचाही ससेमिरा राहत नाही. त्यामुळे अन्य चीजवस्तूऐवजी मोबाईल चोरीला ही टोळी प्राधान्य देते. त्यांनी नागपुरातून यापूर्वी चोरलेले अनेक मोबाईल झारखंडमध्ये विकल्याची कबुली दिली आहे. पोलीस उपायुक्त एस. चैतन्य, ठाणेदार संदीपान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ओरके, एम. एस. हिवरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
नागपुरात झारखंडच्या टोळीकडून पाच लाखांचे स्मार्ट फोन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 20:49 IST
दरोड्याच्या तयारीतील झारखंडच्या एका सशस्त्र टोळीला पकडल्यानंतर सक्करदरा पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाखांचे ६७ स्मार्ट फोन जप्त केले. सात जणांच्या या टोळीतील तिघे अल्पवयीन आहेत, हे विशेष!
नागपुरात झारखंडच्या टोळीकडून पाच लाखांचे स्मार्ट फोन जप्त
ठळक मुद्देसात जणांच्या टोळीत तिघे अल्पवयीनसक्करदरा पोलिसांची कामगिरी