शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांच्या वेतनात पाच कोटींचा घोळ

By admin | Updated: March 21, 2017 01:55 IST

नागपूर शहरातील कचरा उचलणे व वाहून नेण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मधील कामगारांना नियमानुसार वेतन दिले जात नाही.

हजारो कामगारांची मनपावर धडक : आयुक्तांच्या कक्षापुढे ठिय्यानागपूर : नागपूर शहरातील कचरा उचलणे व वाहून नेण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मधील कामगारांना नियमानुसार वेतन दिले जात नाही. अशा प्रकारे गेल्या ११ महिन्यात कनक रिसोर्सेसने ५ कोटी १५ लाखांचा घोळ केला आहे. याविरोधात वारंवार निवेदने दिल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने सोमवारी हजाराहून अधिक कामगारांनी महापालिका कार्यालयावर धडक दिली. थेट आयुक्तांच्या कक्षासमोरील मोकळ्या जागेत तीन तास ठिय्या आंदोलन केले. यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली होती. महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनतर्फे कामगारांच्या मागण्यासंदर्भात महापालिका प्रशासन व कनक रिसोर्सेस व्यवस्थापनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली. परंतु कामगारांना अद्याप न्याय मिळालेला नाही. जानेवारी महिन्यात संघटनेच्या प्रतिनिधींनी कनक व्यवस्थापनासोबत चर्चा केली होती. नियमानुसार कामगारांना दरमहा १४१६० ते १६६६० रुपये वेतन मिळणे अपेक्षित आहे. परंतु कामगारांना ७००० ते ८५०० रुपये वेतन दिले जाते. कनक रिसोर्सेसकडून सफाई कामगारांवर अन्याय केला जातो. कामगारांना वेतनाची पावती दिली जात नाही. एक दिवसाची सुटी घेतल्यास तीन दिवसाचे वेतन कपात केले जाते. कामाच्या २६ दिवसाऐवजी २८ किंवा ३० दिवसांचा महिना धरला जातो. अशा प्रकारे दर महिन्याला तीन ते चार दिवसाच्या वेतनाची कपात केली जाते. १८ एप्रिल २०१६ ते ३० जून २०१६ या कालावधीतील किमान वेतनाचे ३ कोटी १५ लाख कामगारांना देण्यात आलेले नाही. कामगारांना नियमानुसार भत्ता देणे आवश्यक आहे. परंतु आजवर कामकारांना भत्ता मिळालेला नाही. ही रक्कम दोन कोटींच्या आसपास आहे. कामगारांच्या मागण्यासंदर्भात महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन कामगार संघटक सिद्धार्थ प्रभुणे व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन सादर करून कामगारांना न्याय देण्याची मागणी केली. महापालिका प्रशासनाकडून कामगारांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले. कामगारांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रफुल्ल गुडधे व सिद्धार्थ प्रभुणे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)