शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

हिरवळीच्या नावाखाली नागपूर मनपाच्या तिजोरीत पाच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:29 IST

राज्य सरकारकडून मनपाला ८२ हजार रोपटी लावण्याचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. हे उद्दिष्ट सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचे आहे.

ठळक मुद्देएकही रोपटे लावले नाही निधीही उद्यान विभागाला हस्तांतरित नाही

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील वर्षात महानगरपालिकेने वृक्षकराच्या नावाखाली सुमारे पाच कोटी रुपयांची रक्कम गोळा केली आहे. या करामुळे नागरिकांना अधिकचा संपती कर भरावा लागत आहे. मात्र एवढी मोठी रक्कम कराच्या रूपाने वसूल करूनही महानगरपालिकेने एकही रोपटे शहरात लावले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.एप्रिल २०१८ पासून संपती करासोबत वृक्षकराची एक टक्का आकारणी केली जात आहे. २०१८-१९ मध्ये संपती करात वृक्षकरातून ३ कोटी ४८ लाख ८५ हजार रुपयांची रक्कम मिळाली. तर एप्रिल २०१९ ते जुलै २०१९ या काळात एक कोटी १५ लाख १७ हजार रुपये वसूल करण्यात आले; नंतर सप्टेंबरपर्यंतचे आकडे उपलब्ध नाहीत. मात्र पाच कोटींवर वसुली झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मनपाला ८२ हजार रोपटी लावण्याचे लक्ष्य मिळाले आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. हे उद्दिष्ट सप्टेंबरपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यानुसार मनपा कार्यालय परिसर, रोड साईड, मनपाचे मैदान, उद्यान, सार्वजनिक स्थळे आदी ठिकाणी ही रोपटी लावायची होती. यात कड़ूनिंब, काजू, जांभूळ, पिंपळ, सिसम, लेजेस्टोनिया आदींचा समावेश आहे. मात्र कुठेच या रोपट्यांचे रोपण झालेले नाही.

संपत्ती करामध्ये वृक्षकराची वसुली झाल्यावर ही रक्कम उद्यान विभागाकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे या रकमेतून वृक्षारोपण झालेले नाही. सध्या राज्य सरकारकडून मिळालेले ८२ हजार रोपटी लावण्याचे काम सुरू आहे.- अमोल चौरपगारे, उद्यान अधीक्षक, मनपा

रोपटे पूर्णत: विकसित झाल्यावर त्याला वृक्ष म्हणता येईल. खरे तर ही रक्कम मार्च महिन्यातच उद्यान विभागाकडे जायला हवी होती. शहरतील वनराई वाढावी यासाठी सुरू असलेले वृक्षारोपणही नीटपणे व्हायला हवे.- दुनेश्वर पेठे, नगरसेवक

विकासाच्या नावाखाली वृक्षतोड सुरू आहे. मात्र त्या बदल्यात किती वृक्ष लावले जात आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. शहरातील हिरवळ कमी व्हायला नको.- कौस्तुभ चटर्जी 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका