लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेच्या आसीनगर झोनच्या पथकाने सोमवारी जुना कामठी रोडवरील अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजसह पाच मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली.कर व कर आकारणी विभागातर्फे मोठ्या थकबाकीदारांनी थकीत मालमत्ता कर न भरल्याने कराधान नियमान्वये मालमत्ता जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. जुना कामठी मार्गावरील सावरकर ले-आऊ ट येथील मो. अब्दुल रहीम मो. अब्दुल दयाल निझामुद्दीन याची अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजवर २ लाख ५० हजार ११० रुपये मालमत्ता कर थकीत असल्याने हा कारखाना जप्त करण्यात आला. तसेच राणी दुर्गावती चौक येथील आदिवासी सोसायटी येथील आनंदराव वलकरे यांच्याकडे १ लाख ८९ हजार, वैशालीनगर येथील कुलसूम बानो मेनन यांच्या घरावर ८८ हजार ६९८ रुपये, अशोकनगर येथील अर्जुन सहारे यांच्याकडे १ लाख ३५ हजार ८६६ तर मानवनगर येथील निवासी प्रीतम कौर यांच्याकडे २ लाख ४७ हजार ७१३ रुपये थकीत असल्याने या सर्वांची मालमत्ता जप्त करण्यात आली.जप्त करण्यात आलेल्या मालमत्ताधारकांनी पाच दिवसात थकबाकी न भरल्यास या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश राठोड यांनी दिली. जप्तीची कारवाई राजस्व निरीक्षक चंद्रशेखर मोहिते, राजेश कडबे, कर संग्राहक अरुण वैद्य आदींनी केली. जप्ती व लिलावाची कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी थकीत रक्कम भरावी, असे आवाहन महापालिकेच्या कर व कर संकलन विभागाने केले आहे.
नागपुरात अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजसह पाच मालमत्ता जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:08 IST
लाखो रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने महापालिकेच्या आसीनगर झोनच्या पथकाने सोमवारी जुना कामठी रोडवरील अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजसह पाच मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली.
नागपुरात अल झमझम वॉटर इंडस्ट्रीजसह पाच मालमत्ता जप्त
ठळक मुद्देमनपाची कारवाई : ९.११ लाखांचा मालमत्ता कर थकीत