शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यव्यवसाय विकास आराखडा लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:28 IST

विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा कुलगुरूंचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

ठळक मुद्देअनुप कुमार : शेतीपूरक व्यवसायांना गती देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा कुलगुरूंचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या अनुषंगाने विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय विकासाचा कृती आराखडा, अहवाल लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास विदर्भ विकास मंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.विदर्भ विकास मंडळाचे सन २०१७-१८ या वित्तीय वर्षातील दुसरी नियमित बैठक गुरुवारी विदर्भ विकास मंडळाच्या सभागृहात अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर, डॉ. कपिल चांद्र्रायण, डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. किशोर मोघे तसेच विदर्भ विकास मंडळाचे सदस्य सचिव तथा अपर आयुक्त डॉ. निरुपमा डांगे, सहसंचालक अरविंद देशमुख, उपायुक्त नियोजन बी. एस. घाटे, प्रशासकीय अधिकारी मेघा इंगळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. मत्स्यव्यवसाय विकासाच्या या अहवालाची सद्यस्थिती जाणून घेऊन पुढील नियोजन व संबंधित कार्यवाही करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तलाव तेथे मासोळी’ अभियान संपूर्ण नागपूर विभागात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. सन २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय अभियान स्वरूपात राबविण्याची गरज आहे. यासाठी मत्स्यव्यवसायाच्या धर्तीवर चारा उत्पादनास प्रोत्साहन, दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढीपालन, रेशीम तसेच हस्तकला उद्योग अशा शेतीपूरक व्यवसायावर आधारित अभियान राबविण्यास भर देण्यात येईल, असे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यावेळी सांगितले.‘स्टडी आॅन डेव्हलपिंग ग्रोथ स्ट्रॅटेजी फॉर विदर्भ’ हा अभ्यास अहवाल तयार करण्याकरिता आवश्यक असलेल्या माहितीसाठी अकोला, वर्धा, बुलडाणा, यवतमाळ व वाशीम येथे गठित करण्यात आलेल्या उपसमितीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठका पार पडल्या आहेत.उर्वरित जिल्ह्यातील बैठका लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सदस्य सचिव तथा अपर आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी यावेळी दिली. मानव विकास केंद्र, यशदा, पुणे यांच्यावतीने यवतमाळ जिल्ह्याचा विकास अहवाल तयार करण्यात येत आहे. सप्टेंबर महिनाअखेर हा अहवाल विदर्भ विकास मंडळाला प्राप्त होईल.शाळाबाह्य विद्यार्थी व गळतीच्या प्रमाणावर अभ्यास अहवालबालमजुरीमुक्त क्षेत्र घोषणेला साकार करण्यासाठी विदर्भातील शाळाबाह्य मुलांच्या यथास्थितीचा अभ्यास, शाळा नोंदीत नसलेल्या बालकांच्या स्थितीचा अभ्यास करून कार्यरत उपाययोजनांना अधिक परिणामकारक करण्यासाठीच्या अभ्यास प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली. हा अभ्यास अहवाल तयार करताना उपलब्ध असलेल्या शाळाबाह्य विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण याबाबत डॉ. किशोर मोघे यांनी सादर केलेल्या अहवालाला यावेळी मान्यता देण्यात आली.