शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा पहिला बळी

By admin | Updated: September 28, 2014 01:02 IST

शहरात डेंग्यूच्या पहिल्या बळीची नोंद महापालिकेने घेतली आहे. मात्र याचा अहवाल यायला तब्बल २७ दिवसांची प्रतीक्षा मनपाला करावी लागली. सध्या डेंग्यूचे ९२ रुग्ण पॉझिटीव्ह आले. दीनदयालनगर

दीनदयालनगरातील घटना : २७ दिवसानंतर मिळाला अहवाल नागपूर : शहरात डेंग्यूच्या पहिल्या बळीची नोंद महापालिकेने घेतली आहे. मात्र याचा अहवाल यायला तब्बल २७ दिवसांची प्रतीक्षा मनपाला करावी लागली. सध्या डेंग्यूचे ९२ रुग्ण पॉझिटीव्ह आले. दीनदयालनगर येथील रहिवासी धरित्री विनय भट्टलवार (८) मृताचे नाव आहे. सोमलवार निकालस शाळेची वर्ग ४ ची विद्यार्थिनी असलेली धरित्री एकुलती एक मुलगी होती. आई-वडिलांकडून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या धरित्रीला २१ आॅगस्टला ताप आला. तेव्हापासून तिच्यावर शर्थीचे उपचार सुरू होते. खासगी पॅथालॉजीने ती डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचा अहवालही दिला होता. एका खासगी इस्पितळात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू ३१ आॅगस्ट रोजी झाला. याची नोंद महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने घेतली. तिच्या रक्ताचे नमुने ‘इलिझा’ चाचणीसाठी मेयोच्य प्रयोगशाळेत पाठविले. परंतु काही दिवसांतच त्यांच्याकडील ‘इलिझा रिडर’ यंत्र बंद पडले. यामुळे तिचे नमुने त्यांच्याकडेच राहिले. दरम्यान मनपाने डेंग्यू संशयित रक्ताचे नमुने डागा रुग्णालयाकडे पाठविणे सुरू केले. तब्बल २७ दिवसानंतर धारित्रीच्या नमुन्याची तपासणी झाली. यात तिला डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. आता हिवताप व हत्तीरोग विभाग हा अहवाल मनपाच्या आरोग्य विभागासमोर ठेवणार आहे. मनपाने जानेवारी २०१४ ते आतापर्यंत ५६० नमुन्यांची तपासणी केली, यात ९२ जणांना डेंग्यू असल्याचे निदान झाले आहे. मनपातर्फे घराघरांची झाडाझडती घेऊन डेंग्यूवर जनजागृती सुरू आहे. (प्रतिनिधी)