लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनेक गुन्ह्यांमध्ये न्यायालयात साक्षीदार व पंच हे फितूर होऊन आरोपी मोकळे सुटतात. पुन्हा ते गुन्हेगारीकडे वळतात. यादृष्टीने आरोपी निर्दोष सुटू नये म्हणून यशोधरानगर पोलिसांनी खुनाच्या एका प्रकरणातील चार्जशीट ही डिजिटल स्वरूपात न्यायालयात सादर केली. ही राज्यातील पहिली घटना असल्याचे सांगितले जाते.फिर्यादी सुकेशिनी राजेश बल्लारे (३५) रा. एकता कॉलनी, हिचा पती शेरु अली मेहबूब अली याला तिच्या घरी आलेली महिला राजन्ना लक्ष्मी हिची कपड्याची बॅग व त्यात असलेले गांजाचे तीन पॅकेट नेल्याच्या कारणावरून आरोपी गोलू ऊर्फ कुणाल विद्याधर कांबळे (२९) रा. लुंबिनी नगर, राहुल भीमराव इंगळे (२४० रा. बुद्धनगर आणि कुणाल नरेंद्र वाघमारे (२०) रा. लुंबिनीनगर यांनी त्याला मारहाण करून खून केला. ही घटना ९ मार्च २०१८ रोजी घडली. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी प्रकरणाचा तपास, घटनास्थळाचा पंचनामा, आरोपींचा कबुलीजबाब, गुन्ह्याचे संपूर्ण कागदपत्र, दोषारोपपत्रासहीत सर्वांचे चित्रिकरण करून त्याचा व्हिडिओ तयार केला. तो न्यायालयात चार्जशीट म्हणन सादर केला. तपास अधिकारी व पोलीस निरीक्षक पी.वाय. मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक रंदई, पोलीस शिपाई लक्ष्मीकांत, मंगेश देशमुख, राजेंद्र चौगुले, किशोर बिवे यांनी ही कामगिरी केली.
नागपूर न्यायालयात पहिल्यांदाच डिजिटल चार्जशीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:11 IST
अनेक गुन्ह्यांमध्ये न्यायालयात साक्षीदार व पंच हे फितूर होऊन आरोपी मोकळे सुटतात. पुन्हा ते गुन्हेगारीकडे वळतात. यादृष्टीने आरोपी निर्दोष सुटू नये म्हणून यशोधरानगर पोलिसांनी खुनाच्या एका प्रकरणातील चार्जशीट ही डिजिटल स्वरूपात न्यायालयात सादर केली. ही राज्यातील पहिली घटना असल्याचे सांगितले जाते.
नागपूर न्यायालयात पहिल्यांदाच डिजिटल चार्जशीट
ठळक मुद्देखुनाचे प्रकरण : यशोधरानगर पोलिसांची कामगिरी