शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

प्राणघातक हल्ला झालेल्या व्यक्तीकडून पहिल्यांदाच अवयवदान

By सुमेध वाघमार | Updated: March 4, 2023 23:30 IST

मध्यप्रदेशातील बैतुल येथील गंज एमआयजी हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथील रहिवासी दिनेश अग्रवाल (६८) त्या अवयवदात्याचे नाव.

नागपूर : रस्ता अपघातात जखमी किंवा मेंदूत अचानक रक्स्त्राव होऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या व्यक्तीकडून आतापर्यंत अवयवदान होत होते, परंतु एका प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी होऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या व्यक्तीकडून शनिवारी पहिल्यांदाच अवयवदान झाले. यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. सर्वांच्या प्रयत्नामुळे पाच जणांना नवे जीवन मिळाले.

मध्यप्रदेशातील बैतुल येथील गंज एमआयजी हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथील रहिवासी दिनेश अग्रवाल (६८) त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी बकुधना, बैतुल या त्यांच्या कामाचा ठिकाणी एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर नागपूरच्या न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. चार दिवस शर्थीचा उपचारनंतरही त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांच्या एक टिमने त्यांची तपासणी करून ‘ब्रेन डेड’ म्हणजे ‘मेंदू मृत’ झाल्याची घोषणा केली. 

डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना अवयवदानाचा सल्ला दिला. त्या दु:खातही आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी त्यांच्या पत्नी मीना, मुलगा सागर, मुलगी शीतल व श्रुती यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. याची माहिती  ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’चे (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. संजय कोलते व सचिव डॉ. राहुल सक्सेना यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात झोन समन्वयक वीणा वाटोरे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली.

‘एमएलसी’ प्रकरण असल्याने बैतुल पोलिसांची परवानगीहे ‘मेडिको लीगल’ (एमएलसी) प्रकरण होते. जिथे गुन्हा नोंदवला होता त्या स्थानिक बैतुल पोलिसांची अवयवदानाला परवानगी हवी होती. ‘झेडटीसीसी’ने यासाठी पुढाकार घेतला. बºयाच प्रयत्नानंतर पोलिसांची लेखी परवानगी मिळाली. याची माहिती नागपूरच्या लकडगंज पोलिस स्टेशनला देखील देण्यात आली होती.

५२ वर्षीय पुरुषाला दिले यकृतन्यू इरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ५२ वर्षीय पुरुषाला यकृत दान करण्यात आले. एक किडनी याच हॉस्पिटलमधील ३०वर्षीय पुरुष रुग्णाला तर दुसरी किडनी एस.एस. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील ६८ वर्षीय महिलेला दान करण्यात आली. दोन्ही बुबूळ महात्मे आय बॅँकेला दान करण्यात आले. 

टॅग्स :Organ donationअवयव दान