शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर केंद्रात मंत्रिपद; नंतरच राज्याचा विचार

By admin | Updated: June 5, 2016 02:46 IST

निवडणुकीपूर्वी भाजपशी झालेल्या करारानुसार खा. रामदास आठवले यांना अगोदर केंद्रात मंत्रिपद देण्यात यावे.

मुख्यमंत्र्यांना भेटणार रिपाइंचे शिष्टमंडळ : प्रदेशाध्यक्ष थूलकर यांची माहितीनागपूर : निवडणुकीपूर्वी भाजपशी झालेल्या करारानुसार खा. रामदास आठवले यांना अगोदर केंद्रात मंत्रिपद देण्यात यावे. त्यानंतर राज्यातील इतर पदांचा विचार केला जाईल. यासंदर्भात विदर्भातील पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईल, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) चे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपने मित्रपक्ष असलेल्या खा. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी विधान परिषदेची एक जागा देऊ केली होती. परंतु त्यासंदर्भात रिपाइंचे ज्येष्ठ नेते महातेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही जागा घेण्यास नकार दिला. यावरून पक्षात गैरसमज निर्माण झाला. ही जागा भूपेश थूलकर यांना मिळणार असल्याने त्यांचा पत्ता साफ करण्यासाठीच ही जागा नाकारण्यात आल्याचे काही कार्यकर्त्यांना विशेषत: विदर्भातील कार्यकर्त्यांना वाटू लागले. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. यातच थुलकर यांनी शनिवारी नागपुरात विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर तर नाही ना, असा संशय व्यक्त केला गेला. परंतु हा केवळ संशयच राहिला.रविभवन येथे रिपाइं (आ) च्या विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना भूपेश थुलकर यांनी पक्षात कुठलीही फाटाफूट नसल्याचे स्पष्ट केले. खा. रामदास आठवले यांचा निर्णय आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. खा. आठवले यांना मंत्रिपद मिळत नाही, तोपर्यंत राज्यात आम्ही कुठलेही पद घेणार नाही, ही पक्षाची भूमिका आहे. ती सर्वांनाच मान्य आहे. महातेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. तेव्हा खा. आठवले हे देशाबाहेर होते तर मी (प्रदेशाध्यक्ष) पुण्यात होतो. आम्ही दोघेही नसल्याने पक्षाची ती अधिकृत भूमिका आहे की नाही, असे कार्यकर्त्यांना वाटले. त्यामुळे संशय निर्माण झाला होता. परंतु खा. आठवले यांच्याशी बोलूनच महातेकर यांनी जाहीर केल्याचे नंतर स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.पत्रकार परिषदेत विदर्भ अध्यक्ष भीमराव बन्सोड, विदर्भ संघटक राजन वाघमारे, अशोक मेश्राम, आर.एस. वानखेडे, दुर्वास चौधरी, डॉ. भीमराव मस्के, मनोज मेश्राम, भीमराव कांबळे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)१ जुलैपासून विदर्भ जनजागृती अभियान रिपाइंचे संस्थापक सदस्य बाबू हरिदास आवळे यांच्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त येत्या १ जुलैपासून विदर्भ जनजागृती अभियान सुरू करण्यात येणार आहे. यात विदर्भ यात्रा काढणे, जनजागृती करणे आदींंच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भासाठी पक्षातर्फे मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, असेही शनिवारच्या बैठकीत ठरल्याचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांनी सांगितले. प्रभाग पद्धतीच्या विरोधात न्यायालयात जाणार चार सदस्यांचा एक प्रभाग ही पद्धती छोट्या पक्षांसाठी तसेच विकासासाठी घातक आहे. त्यामुळे या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात पक्षातर्फे याचिका दाखल करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईचे प्रसिद्ध वकील बी.के. बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्याशी समन्वय साधून याचा विरोध केला जाईल, असेही बैठकीत ठरल्याचे थुलकर यांनी सांगितले.