शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात झाले आधी भूमिपूजन नंतर घेणार जमिनीचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 10:06 IST

कुठल्याही प्रकल्पासाठी जागा निश्चित झाल्यानंतरच त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली जाते. परंतु बुटीबोरी येथे होणारे राज्य कर्मचारी विमा मंडळा(ईएसआयसी)च्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज २०० बेडच्या रुग्णालयाची कहाणीच वेगळी आहे.

ठळक मुद्देप्रश्न बुटीबोरीतील २०० बेडच्या रुग्णालयाचा चार महिन्यानंतर एमआयडीसीने ईएसआयसीला सुचविली जागा

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही प्रकल्पासाठी जागा निश्चित झाल्यानंतरच त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली जाते. परंतु बुटीबोरी येथे होणारे राज्य कर्मचारी विमा मंडळा(ईएसआयसी)च्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज २०० बेडच्या रुग्णालयाची कहाणीच वेगळी आहे. याचे भूमिपूजन १५ जुलै रोजी करण्यात आले. परंतु जमीन मात्र निश्चित झालेली नाही. भूमिपूजनाच्या चार महिन्यानंतर एमआयडीसीने पाच एकर जागा चिन्हित केली. परंतु यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.या रुग्णालयाची आतापर्यंतची कहाणी आश्चर्यजनक आहे. दोन वर्षांपूर्वी बुटीबोरी येथे मध्य भारतातील कामगारांसाठी अत्याधुनिक रुग्णालयाची संकल्पना पुढे आली. एमआयडीसीकडे जागेची मागणी करण्यात आली. सिएट कंपनीजवळ पाच एकर जमीन देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यानंतर तडकाफडकी रुग्णालयाच्या भूमिपूजनाची तारीख निश्चित झाली.भूमिपूजनाच्यादिवशी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, ही जागा तर महामार्गापासून १५ किलोमीटर दूर आहे. दूरवरून येणाºया कामगारांना रुग्णालयापर्यंत येण्यास त्रास होईल. यासोबतच ईएसआयसीने एमआयडीसीला जमीन घेण्यास नकार देत नवीन जागा देण्यास सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन जागा देण्याचे निर्देश दिले. यानंतर जमिनीचा शोध सुरू झाला. साडेतीन महिन्याच्या परिश्रमानंतर एमआयडीसीच्या अधिकाºयांनी आपल्याच कार्यालयाजवळ पाच एकर जमीन शोधली. ईएसआयसीला सूचित करण्यात आले. ईएसआयसीच्या एका उच्चस्तरीय चमूने नागपुरात येऊन बुटीबोरीतील नवीन जागेची पाहणी केली. सूत्रानुसार स्थानिक कार्यालयाने या जागेबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. परंतु अंतिम निर्णय समितीची शिफारस आणि मुख्यालयाच्या भूमिकेवरच अवलंबून आहे.

नवीन जागेबाबत सकारात्मक धोरणईएसआयसीचे असिस्टंट डायरेक्टर मनोज कुमार यादव यांनी सांगितले की, एमआयडीसीने अगोदर ज्या जागेचा प्रस्ताव ठेवला होता, तो खूप दूर होता. रुग्णांना यामुळे त्रास झाला असता. त्यामुळे नवीन जागेची मागणी करण्यात आली. आता एमआयडीसीने आपल्या कार्यालयाजवळच पाच एकर जागा चिन्हित केली आहे. या जागेबाबत कार्यालयाचे धोरण सकारात्मक आहे. परंतु अंतिम निर्णय मात्र मुख्यालयातूनच होईल.

१८० कोटीचा प्रकल्पईएसआयसीद्वारे बुटीबोरी येथे प्रस्तावित अत्याधुनिक रुग्णालयाचा प्रकल्प हा १८० कोटीचा आहे. हे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. मध्य भारतातील कामगारांना आरोग्य सुविधा प्रदान करेल. येथे कॅन्सर रुग्णांसाठी विशेष सुविधा राहतील, असा दावाही केला जात आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल