शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आधी घरात मारले आणि मग प्रेत पुरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:07 IST

उमरेड (नागपूर) : पैशाच्या वाटणीतून झालेल्या क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवला. रागाच्या भरात आरोपींनी घरातच रेल्वे रुळाच्या लोखंडी तुकड्यावर डोके ...

उमरेड (नागपूर) : पैशाच्या वाटणीतून झालेल्या क्षुल्लक कारणावरून वाद उद्भवला. रागाच्या भरात आरोपींनी घरातच रेल्वे रुळाच्या लोखंडी तुकड्यावर डोके आपटून ठार केले. रात्रभर प्रेत घरीच ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पोत्यामध्ये सायकलवरून प्रेत नेत पुरले. उमरेड येथील हा खळबळजनक प्रकार शुक्रवारी नागरिकांच्या सतर्कतेमुळे तब्बल पाच दिवसांनंतर उजेडात आला.

ग्याना रूपराव शेंडे (वय २३, रा. रेल्वे झोपडपट्टी, उमरेड) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी विजय ऊर्फ गोलू सखाराम मांडले आणि त्याचा भाऊ सुरजित सखाराम मांडले (रा. झोपडपट्टी, उमरेड) या दोन आरोपींना अटक केली आहे. रविवारी ५ सप्टेंबर दुपारी ४ वाजताच्या दरम्यानची ही घटना असून उमरेड सेवा मार्गावरील आंबराई परिसरातील एका निर्जनस्थळी असलेल्या केबल वायरच्या खड्ड्यात प्रेत पुरण्यात आले होते.

मृतक ग्याना शेंडे हा लोहालोखंड साहित्याची जुळवाजुळव करीत विक्री करण्याचा धंदा करीत होता. आरोपी गोलू व सुरजित मांडले माती खोदकाम करतात. हे दोन्ही भाऊ मृतक ग्यानाचे मित्र होते. तिघेही आणलेल्या लोखंडी साहित्याची आपसात वाटाघाटी करीत विल्हेवाट लावायचे. रविवारी, ५ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास आरोपी गोलू आणि सुरजित यांच्या घरी मृत ग्याना शेंडे हा पार्टी करीत होता. याच दरम्यान वाटाघाटीच्या पैशावरून ठिणगी उडाली आणि दोन्ही आरोपी भावांनी ग्याना शेंडे याला ठार मारले, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांनी दिली.

उमरेड पोलीस ठाण्यात ३०२, २०१,३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची संभावना व्यक्त होत आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक चमूने नमुने घेतले. नागपूर येथे शवविच्छेदनासाठी मतृदेह रवाना करण्यात आला.

----

हरविल्याची तक्रार केली

मृतक ग्यानाचा मोठा भाऊ श्याम रूपराव शेंडे याने भाऊ हरविल्याची तक्रार सोमवारी ६ सप्टेंबरला दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी नेहमीप्रमाणे तपास करू, असे सांगितले. दरम्यान, दोन दिवसांतच परिसरात कुजबुज सुरू झाली. झोपडपट्टीमधील नागरिक वारंवार पोलीस ठाण्यात येऊ लागले. ग्याना शेंडे याचा खून झाला असून आम्हास आरोपी गोलू व सुरजित यांच्यावर संशय असल्याचे सांगितले. त्यानंतरही या प्रकरणाची दखल फारशी घेतली गेली नाही, असा आरोप झोपडपट्टीवासीयांचा आहे.

--

मोर्चा गेला, गूढ उकलले

शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास नगरसेवक नागेश मानकर, रामसिंग लोंढे, गणेश पवार, शेखर शिवनकर, गरिबा मानकर, बबन मानकर, नेवापाल पात्रे यांच्यासह झोपडपट्टीमधील नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांना बोलवाल, असा हट्ट नागरिकांनी केला. तब्बल चार तास चर्चा झाली. नागपूर जिल्हा ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर उमरेड येथे पोहोचले. नागरिकांनी खून झाल्याचा संशय व्यक्त करीत निवेदन दिले. आरोपींची नावेही सांगितली. दरम्यान, काही काळ नारेबाजीही झाली. अशातच पोलिसांची एक चमू संशयित आरोपींकडे रवाना करण्यात आली. लागलीच सहाजणांना ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. दोन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला. नागरिकांनी सतर्कता दाखविली नसती तर प्रकरण प्रेतासह दफन झाले असते, अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत.