शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेल रुग्णाचे पहिले ‘किडनी ट्रान्सप्लांट’

By admin | Updated: December 27, 2016 02:55 IST

आई आणि मुलगा दोन्ही सिकलसेलचे रुग्ण. मात्र दोघांचेही रक्तगट जुळत होते. इतर पर्यायही उपलब्ध

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : आईने दिले मुलाला जीवनदान नागपूर : आई आणि मुलगा दोन्ही सिकलसेलचे रुग्ण. मात्र दोघांचेही रक्तगट जुळत होते. इतर पर्यायही उपलब्ध नव्हते. अशावेळी अत्यंत जोखीम घेऊन डॉक्टरांनी आईचे मूत्रपिंड मुलामध्ये यशस्वीपणे प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) केले. राज्यातील शासकीय रुग्णालयात सिकलसेल रुग्णावरील ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ मध्ये एका ‘हिपॅटायटिस सी’ग्रस्ताच्या यशस्वी किडनी ट्रान्सप्लांटला १५ दिवस होत नाही तोच सोमवारी या अवघड शस्त्रक्रियेमुळे ‘सुपर’चे नाव उंचावले आहे. रक्ताशी संबंधित आणि अतिशय वेदनादायी आजार म्हणून सिकलसेलला ओळखल्या जाते. हा आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतो. हा आजार वाहक आणि रुग्ण अशा दोन गटांत विभागल्या जातो. सिकलसेलग्रस्तांना आयुष्यभर असह्य वेदना होतात. रुग्णाच्या तुलनेत वाहकाच्या वेदना कमी असतात. नागपुरातील नंदनवन भागातील रहिवासी असलेल्या संदीप उके या सिकलसेलच्या रुग्णालाही या दुखण्यातून जावे लागत होते. यातच या तरुणाला किडनी विकार जडला. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. तो डायलिसिसवर जगत होता. आपल्या मुलाची ही अवस्था आई वनमाला उके यांना अस्वस्थ करीत होती. तिने मुलाला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. तपासण्या झाल्या. मात्र मुलगा आणि माता दोघेही ‘ए एस पॅटर्न’(वाहक)मधील सिकलसेलने पीडित असल्याचे निदर्शनास आले. मात्र रक्तगट जुळत होता. अशा रुग्णाचे किडनी प्रत्यारोपण करणे हे अतिशय जोखीमीचे कार्य ठरते. परंतु डॉक्टरांनी ही जोखीम पत्कारली. सिकलसेल वाहक असलेल्या दोघांच्याही किडनीचे प्रत्यारोपण केले.